Nashik abortion case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Crime News : महाराष्ट्रात आणखी एका सुनेचा छळ, नर्स सासुने घरातच केला गर्भपात ; गोळ्या दिल्या, सलाईन लावले अन्..

Nurse Mother-in-law Forces Abortion at Home in Nashik : याप्रकरणी पीडित महिलेने नाशिकच्या आडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सासू सुचित्रा पाठक, सासरे प्रवीण पाठक, ननंद स्मिता पाठक आणि पती भूपेश पाठक या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Ganesh Sonawane

Nashik abortion case : हुंड्यासाठी सासरच्यांकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून 37 वर्षीय विवाहित महिला भक्ती अथर्व गुजराथी हिने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आंतरजातीय लग्न मान्य नसल्यामुळे सासरच्या मंडळींनी सूनेचा छळ केला. जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच नर्स असलेल्या सासूने तिचा घरीच गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सात वर्षांपूर्वी पीडित महिलेने भूपेश पाठक या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, आंतरजातीय विवाह असल्यामुळे पीडित महिलेला सासू सासरे आणि नणंद यांच्याकडून वारंवार जातीवाचक शिवीगाळ केली जात होती. तीचा छळ करण्यात येत होता. पती देखील तिला खालच्या जातीची आहेस असं म्हणत नांदवण्यास तयार नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला गर्भवती असताना नर्स असलेल्या सासूने घरातच सुनेचा गर्भपात केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने नाशिकच्या आडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सासू सुचित्रा पाठक, सासरे प्रवीण पाठक, ननंद स्मिता पाठक आणि पती भूपेश पाठक या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चौघांना अटक करुन पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून समाजात संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी संबधित आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

पीडित महिला आणि भूपेश पाठक या दोघांचे शिक्षण एकाच महाविद्यालयात झाले. 2017 पासून ते दोघे एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर दोघांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यातून झालेल्या शारीरिक संबंधातून महिला गर्भवतील झाली. तेव्हा भूपेशने गोळ्या देऊन महिलेचा गर्भपात केला होता. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. मात्र त्यासंदर्भात एक मित्र वगळता कोणालाही माहिती नव्हती. पीडित महिला आणि भूपेश पाठक दोघेही लग्न होऊनही आपापल्या घरी राहत होते.

लग्नानंतर दोघांमध्ये झालेल्या शारीरिक संबंधातून पीडित महिला पुन्हा गर्भवती झाली. ही गोष्ट भूपेशच्या घरच्यांना समजल्या नंतर तीच्या घरच्यांनी महिलेला घरी बोलावून घेतलं. पीडित महिलेच्या नर्स असलेल्या सासूने तीला घरीच गर्भपाताच्या गोळ्या दिल्या व सलाईन लावले. त्यानंतर सासरच्यांनी या महिलेला पुन्हा घरी पाठवून दिले. तीला घरात घेतलं नाही. गर्भपात झाल्यानंतर आता भूपेश या महिलेला घरी नांदवायला तयार नाही. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT