Nashik Crime : वैष्णवी सारखाच भक्तीचा घेतला'बळी'; पतीसह सासू-सासरे गुजरातला लपले, पोलिसांनी शोधून काढलं..

Bhakti's husband, mother-in-law and in-laws arrested from Gujarat : नाशिकमध्येही पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेतलेल्या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासर्‍यांना गुजरातच्या नवसारीतून अटक करण्यात आली आहे.
Bhakti gujarati Death
Bhakti gujarati DeathSarkarnama
Published on
Updated on

Nasik crime : नाशिकमध्येही पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेतलेल्या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासर्‍यांना गुजरातच्या नवसारीतून अटक करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

नाशिकच्या गंगापूर रोड भागातील सिरीन मेडोज या ठिकाणी राहणाऱ्या 37 वर्षीय विवाहित महिला भक्ती अथर्व गुजराथी हिने 19 मे रोजी घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मृत महिलेच्या आई-वडिलांनी केल्यानंतर नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात पती सासू-सासरे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र या प्रकरणानंतर तिघेही फरार झाले होते. या प्रकरणी भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतल्यानंतर भक्ती गुजराथीचा पती आणि सासऱ्याला गुजरातच्या नवसारीमधून नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.

भक्ती आणि अथर्व यांचा डिसेंबर 2017 मध्ये प्रेमविवाह झाला होता. दोघांमध्ये १७ वर्षांपासून प्रेमसंबंध होते, कुटुबीयांच्या विरोधानंतरही त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर अथर्व भक्तीला मारहाण करीत माहेराहून पैसे आणण्यासाठी त्रास देत होता. तसेच विवाहानंतर अथर्वचे देश-विदेशातील अन्य महिलांसोबतचे फोटो आणि अनैतिक संबध उघकीस आल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले. भक्तीला तिची सासू मधुरा हिचाही विरोध होता. त्याला कंटाळून भक्ती जानेवारी 2025 मध्ये मुलासह माहेरी आली होती. त्यानंतर दोन-अडीच महिन्यांनी अथर्वने भक्तीला पुन्हा सासरी नेले.

Bhakti gujarati Death
Manikrao Kokate : कांदा सडला, शेतकरी रडला.. तरी अधिकारी फिरकेना ; कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्याला कोणी वाली नाही..

4 मे रोजी भक्तीने पती अथर्व दारु पिऊन त्रास देत असल्याची तक्रार तिच्या भावाकडे केली. त्यामुळे भक्तीचे माहेरचे पुन्हा तिच्या सासरी गेले. त्यावेळीही अथर्व व त्याच्या आई वडिलांनी समजूत काढून पुन्हा त्रास देणार नाही असे सांगितले. त्यामुळे नातलग पुन्हा घरी गेले. त्यानंतर सोमवारी (दि. 19) सकाळी भक्तीने गळफास घेतल्याचे समजले.

पती आणि सासरच्या छळाला कंटाळून भक्तीने आत्महत्या केल्याचे दिलीप माडीवाले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अथर्व गुजराथी (36, सिरीन मिडोज), सासरे योगेश मणिलाल गुजराथी व सासू मधुरा योगेश गुजराथी (दोघे रा. नवीन पंडित कॉलनी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल होताच तिघेही पसार झाले होते. अथर्वला अटकेच्या मागणीसाठी भक्तीच्या माहेरच्यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला होता. अखेर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com