Nashik DCC Bank Annual General Meeting : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोमवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. सभेत निफाड सहकारी साखर कारखान्याच्या सध्य स्थितीचा मुद्दा बॅंक प्रशासनाच्या समोर काही सभासदांनी मांडला. मात्र ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर सर्वसाधारण सभेत चर्चा न करता सभा आटोपती घेतल्याने सभासद आणि जिल्हा बँकेचे प्रशासक यांच्यात गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.
या सभेत मंत्री नरहरी झिरवाळ देखील उपस्थित होते. मंत्री झिरवाळ यांच्यासमोर सभासदांनी निफाड सहकारी साखर कारखान्याच्या सध्य स्थितीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र सर्वसाधारण सभेत प्रशासन चर्चेला तयार झाले नसल्याने आक्रमक सभासदांनी मंत्री झिरवाळ आणि जिल्हा बँकेचे प्रशासक यांना घेरण्याचा प्रयत्न केला. खंडू बोडके, राजेंद्र मोगल यांच्यासह अन्य सभासद यावेळी आक्रमक झाले होते.
सभेत वातावरण तापल्याचे पाहता पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिसांच्या बंदोबस्तात मंत्री नरहरी झिरवाळ यांना सभेतून बाहेर काढण्यात आलं. यानंतर काही सभासदांनी प्रशासक संतोष बिडवई यांची गाडी अडवली. त्यांना गाडीतून बाहेर या असे सांगत सभासदांनी बराचवेळ त्यांची गाडी पुढे जाऊ दिली नाही. यावेळी धक्काबुक्की झाल्याचा दावाही केला जात आहे. तणावाची परिस्थिती पाहता मंत्री नरहरी झिरवाळ आणि प्रशासन संतोष बिडवई यांनी तिथूना काढता पाय घेतला.
नेमका विषय काय ?
निफाड साखर कारखान्यातील कथित घोटाळ्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी सभासदांनी केली. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी राष्ट्रगीत म्हणत सभा गुंडाळण्यात आल्याने संतप्त सभासदांनी सभेतच आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा न करता सभा गुंडाळली जात असल्याचा आरोप सभासदांनी केला. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी आपला आक्षेप नोंदवत घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे सभास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, मंत्री नरहरी झिरवाळ आणि बँकेचे प्रशासक संतोष बिडवई यांना शेतकऱ्यांनी सभेतच घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलीस बंदोबस्तात मंत्री झिरवाळ यांना सभास्थळातून बाहेर काढण्यात आले. शेतकऱ्यांकडून मंत्री नरहरी झिरवाळ यांचा ताफा देखील अडवण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले. तर, प्रशासक संतोष बिडवई यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न संतप्त शेतकऱ्यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.