Jalgaon DCC Bank Election : निवडणुकीच्या मैदानात समोरासमोर भिडू, मंत्री रक्षा खडसे यांचे आमदार चंद्रकांत पाटील यांना आव्हान

Raksha Khadse On Chandrakant Patil : जळगाव जिल्हा बॅंकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील विरुद्द खडसे असा वादाचा कलगीतुरा रंगला आहे. दोघांकडून एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत.
मंत्री रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील
Raksha Khadse On Chandrakant PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बॅंकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजप नेत्या तथा मंत्री रक्षा खडसे व मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात वादाचा कलगीतुरा रंगला आहे. चंद्रकांत पाटील यांनी खडसेमुक्त जिल्हा बॅंक करण्याचा आपला प्रयत्न सुरु असल्याचे सांगत खडसे परिवारावर घराणेशाहीचा आरोप केला होता. रक्षा खडसे यांनी आता पाटील यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.

निवडणुकीवरून लक्ष्य करणाऱ्या आमदार चंद्रकांत पाटील यांना रक्षा खडसे यांनी चांगलेच सुनावले आहे. आधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची चिंता करा, निवडणुकीच्या मैदानात समोरासमोर भिडूच," असा इशारा रक्षा खडसेंनी चंद्रकांत पाटील यांना दिला. त्या जळगावात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलत होत्या.

जिल्ह्यावर आज दुष्काळाचे भीषण संकट आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आ वासून उभे असताना लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी निवडणुकीची चिंता न करता आधी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे. निवडणुका डिसेंबरमध्ये आहेत, तेव्हा आम्ही समोरासमोर भिडूच. जिल्हा बॅंक 'खडसेमुक्त' करायची की नाही याचा निर्णय मतदार घेतील, चंद्रकांत पाटील भाजपचे सर्वेसर्वा नाहीत अशा शब्दात रक्षा खडसेंनी आमदार पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

मंत्री रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील
Raksha Khadse : ‘तुम्ही तुमचं बघा, आधी आरशात पाहा ! रक्षा खडसेंनी घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या शिवसेना आमदाराला सुनावलं

चंद्रकांत पाटलांच्या राजकारणाचा पायाच खडसे विरोधावर आधारलेला आहे. आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन घराणेशाहीचे आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या घरात डोकावून पाहावे. मुक्ताईनगर पालिकेत स्वतःच्या मुलीला नगराध्यक्ष करून तिथे काय कारभार केला, हे जनतेला ठाऊक असल्याचे रक्षा खडसे म्हणाल्या.

मंत्री रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील
JDCC Bank Election : जिल्हा बँकेच्या ‘पिच’वर मंत्री-आमदार उतरले; मंत्री गिरीश महाजन यांच्यासह खडसे, चव्हाण यांचे ठराव चर्चेत..

तीन ठिकाणी ठराव करण्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना त्या म्हणाल्या, "कोथळीत माझे घर आहे, घोडसगावला शेती आहे, तर कर्की येथे नातेवाईक असून तिथल्या स्थानिक लोकांनी आग्रहाने ठराव केला आहे. मी पदाचा कोणताही गैरवापर केलेला नाही. स्वतः मंत्रिपदावर नसतानाही यंत्रणेवर दबाव आणणाऱ्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये. आधी आपण काय बोलतो आणि काय करतो याचे आत्मचिंतन करावे," असा खणखणीत टोला रक्षा खडसेंनी आमदार पाटलांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com