Sunetra Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP News: नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 7 आमदार, तरी निधी मिळविण्यासाठी धडपड

NCP Political News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार आहेत. यातील काही आमदार काँग्रेस सह अन्य पक्षातून तर उर्वरित शरदचंद्र पवार पक्षातून आलेले आहेत. निधी मिळवणे या एकमेव हेतूसाठी पक्षांतर केल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे.

Sampat Devgire

Sunetra Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वरिष्ठ नेते थेट भाजपचे गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. लगोलग उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबईत आमदारांची बैठक घेतली. त्यामुळे या पक्षात काहीतरी अस्वस्थता असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार आहेत. यातील काही आमदार काँग्रेस सह अन्य पक्षातून तर उर्वरित शरदचंद्र पवार पक्षातून आलेले आहेत. निधी मिळवणे या एकमेव हेतूसाठी पक्षांतर केल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे.

ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात सातत्याने विविध योजना आणि कामांच्या भूमिपूजनाच्या बातम्या येत असतात. दुसरे मंत्री झिरवाळ हे मात्र आपल्या मतदारसंघातच व्यस्त आहेत. इतर आमदारांची तशी स्थिती नसल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे. अन्य आमदारांचा सवता सुभा प्रामुख्याने निधी मिळविण्यासाठी धडपड यामध्ये आहे.

या आमदारांमध्ये परस्परांतील विसंवाद अनेकदा स्पष्ट झाला आहे. जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर आणि विशेषता कांदा व अन्य शेतीच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांनी आंदोलने केली. हे आंदोलन प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात झाली आहेत.

आमदारांचा सर्व भर मात्र निधी कशा मिळेल आणि प्रत्येक विकास कामावर आपलाच हक्क व्यक्त करण्यावर असल्याची धुसफुस वारंवार कानावर येते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या या आमदारांची निधी मिळूनही राजकीय कोंडी झाल्याचे चित्र आहे.

आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी या आमदारांच्या अपेक्षांना वाट करून दिली आहे. भाजप कडे गेलेले अर्थ खाते पुन्हा मिळविण्यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे. सध्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची त्यामुळेच होणारी कोंडी चर्चेचा विषय आहे. कार्यकर्ते, आमदार तसेच पदाधिकाऱ्यांतील दुरावा त्याला कारणीभूत ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT