eknath shinde hemant godse
eknath shinde hemant godse sarkaranama
उत्तर महाराष्ट्र

Hemant Godse : गोडसे पराभूत होणार हे माहीत होते; मात्र 'या'मुळे दिली उमेदवारी

Sampat Devgire

Hemant Godse News : नाशिक मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे पराभूत झाले. या पराभवाविषयी आता विचार मंथन सुरू झाले आहे. यामध्ये धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

लोकसभेची उमेदवारी देताना जिंकण्याची क्षमता हा मुख्य निकष निश्चित करण्यात आला होता. यासंदर्भात महायुतीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित बैठक घेऊन उमेदवारीचे निकष ठरविले होते. यामध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) पात्र नव्हते. पण, त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्तिशः निर्णय घेऊन उमेदवारी दिली आहे.

नाशिक मतदारसंघात उमेदवारीसाठी महायुतीचे विविध नेते इच्छुक होते. भारतीय जनता पक्ष या मतदारसंघासाठी विशेष आग्रही होता. त्यावरून मोठे राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. अजित पवार गटाचे नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) हे देखील एक प्रबळ इच्छुक होते. मात्र, या सगळ्यांना बाजूला ठेवून उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार गोडसे यांच्या उमेदवारीबाबत एक सूचक विधान केले होते. निवडणुकीच्या निकालात खासदार गोडसे पराभूत झाले. यावरून त्यांनी देखील भुजबळ यांचे नाव न घेता भुजबळ यांनी आपल्या प्रचार केला नसल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे एक नवा राजकीय वाद महायुतीच्या घटक पक्षांमध्ये निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

गोडसे यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता नव्हती, तरीही त्यांना उमेदवारी देण्यात आली. यावर आता विविध मतप्रवाह पुढे येत आहेत. महायुतीच्या भाजप आणि अजित पवार गटाने गोडसे यांना उमेदवारी देऊ नये, असा आग्रह धरला होता. या सर्व वादात उमेदवारीचा निर्णय लांबला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः लक्ष घालून गोडसे यांना उमेदवारी दिली. त्याचे एक वेगळेच कारण पुढे आले आहे. शिवसेनेच्या खासदारांनी उद्धव ठाकरे यांना 'जय महाराष्ट्र' करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामध्ये गोडसे खूप आधी शिंदेंच्या बाजूने उभे राहिले होते. त्यांनी अन्य खासदारांचा प्रवेश घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पक्ष सोडल्यानंतर देखील उमेदवारी मिळाली नाही, असा संदेश जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी गोडसे यांना उमेदवारी दिल्याचे कळते.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT