Hemant Godse News: कार्यकर्ते नसलेल्या दलबदलूंच्या फौजेने केला हेमंत गोडसे यांचा घात!

Nashik Loksabha Election 2024 Result : नाशिक मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात सरळ सामना झाला. यामध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे यांनी एक लाख 62 हजार मताधिक्यांनी पराभूत केले.
Hemant Godse
Hemant Godse sarkarnama

Hemant Godse News: शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांची हॅट्ट्रिक यंदा हुकली. गोडसे यांनी घडविलेल्या नेत्यांच्या घाऊक पक्षांतराने मतदारांमध्ये वेगळा संदेश गेला. त्याची झळ गोडसे यांना बसली.

नाशिक मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात सरळ सामना झाला. यामध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे यांनी एक लाख 62 हजार मताधिक्यांनी पराभूत केले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गोडसे यांना एकदाही मतांची आघाडी मिळाली नाही.

महायुतीमध्ये नाशिकची जागा कोणाला यावरून मोठा वाद झाला. भाजप हटून बसले. भुजबळ यांना येथून उमेदवारी हवी होती. शिंदे गट ही जागा सोडायला तयार नव्हता. या सर्व राजकीय गुंतागुंतीने मतदारांमध्ये अतिशय नकारात्मक संदेश गेला. गोडसे यांना उमेदवारी मिळाली, तेव्हा त्यांच्याबरोबरचे अनेक इच्छुक त्यांचे विरोधक झाले होते.

बऱ्याच आधी प्रचाराला सुरुवात केलेल्या राजाभाऊ वाजे यांच्याबरोबर गोडसे समर्थक निघून गेले होते. सर्वात प्रबळ इच्छुक मंत्री छगन भुजबळ होते. गोडसे यांच्या प्रचारात भुजबळ यांच्या समर्थकांनी कोणती भूमिका पार पाडली याबाबत वेगळीच कुजबुज आहे.

गोडसे यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडले शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेच्या भाषेत गद्दारी केली. त्याचे कारण काय? हे शेवटपर्यंत पटवून शकले नाही.गोडसे यांनी या काळात शिवसेनेच्या अनेक निष्ठावंतांना शिंदे गटात प्रवेश घडवले. वाजे यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली.

त्यानंतर जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी त्या विरोधात बंड केले. या करंजकर यांना शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. त्याचा प्रचंड गाजावाजा झाला. या सर्व 'कोटीच्या' मनसुबदारांमागे प्रत्यक्षात कार्यकर्ते नव्हते. ते मतदानातून दिसले. ते समजले तेव्हा खूप उशीर झाला होता.

Hemant Godse
Gowal Padavi: काँग्रेसच्या नव्या खासदाराला आशीर्वाद देताना शिंदे गटातील नेत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू!

शिंदे गटात अनेक मोठे नेते असल्याचा दावा केला जातो प्रत्येक्षात त्यांच्याकडे कुठलीही संघटना अस्तित्वात नाही. अजय बोरस्ते विजय करंजकर माजी मंत्री बबन घोलप यांपासून तर अनेक मोठ्या नेत्यांच्या भागात गोडसे यांना किती मते मिळाली हा शोध घेण्याचा विषय आहे.

याबाबत मोठे उदाहरण देता येईल. श्री गोडसे देवळाली विधानसभा मतदारसंघातून येतात. येथे माजी मंत्री घोलप, विजय करंजकर तसेच अन्य काही मोठे नेते आहेत. देवळाली या घरच्या मतदारसंघात गोडसे सत्तावीस हजारांनी पिछाडीवर आहे. त्यांच्या गावात किती मते मिळाली. हा संशोधनाचा विषय आहे. घरच्या मतदारांनीच नाकारले. त्यामुळे वाजे यांचा विजय सुलभ झाला.

तो व्हिडिओ...

गोडसे यांची मतदार संघात फारसी चर्चा नव्हती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओने त्यांचा निवडणुकीपर्यंत इच्छा पुरवला. अगदी निवडणूक घोषणापत्रात देखील गोडसे यांना त्याबाबत एक नोंद दाखवावी लागली. हा विरोधकांना मिळालेला सगळ्यात मोठा मुद्दा होता.

गोडसे यांना भाजपचे आमदार असलेल्या मतदार संघातून चांगली आघाडी आहे. भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनाही गोडसे यांची आघाडी रोखता आली नाही. मात्र ती आघाडी वाजे यांना सिन्नर आणि इगतपुरी येथे मिळालेल्या आघाडी पुढे किरकोळ होती. त्यामुळे वाजे यांचा विजय आणि गोडसे यांचा पराभव सुलभ झाला.

Hemant Godse
Mahesh Gaikwad : आता आठ गोळ्या घालणार...; गोळीबारातून वाचलेल्या महेश गायकवाड यांना पुन्हा धमकी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com