Nashik Politics : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं पहायला मिळतंय. दरम्यान नाशिकच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये घडलेल्या एका घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगर भागात प्रचारादरम्यान आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहिरे यांना प्रचार करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप आम आदमीच्या वतीने करण्यात आला होता. थेट बंदूक रोखून अहिरे यांना धमकवल्याचा आरोप करण्यात आला. आम आदमी पार्टीने त्यांना प्रचाराला न फिरण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप केला होता.
मात्र पोलीस तपासात वेगळच सत्य समोर आलं आहे. समाधान आहिरे यांच्यावर रोखण्यात आलेली ती बंदूक नसून बंदुकीसारखा दिसणारा लायटर असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासातून निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आता परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
प्रभाग क्रमांक ११ मधील सातपूर येथील प्रबुद्ध नगर परिसरात प्रचार सुरू असताना आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान अहिरे कार्यकर्त्यांसोबत असताना, सार्थक गोवर्धन नावाच्या तरुणाने त्यांच्या दिशेने बंदूक दाखवत “प्रचार करू नका” अशी धमकी दिल्याचा आरोप ‘आप’कडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त झालेल्या कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी संबंधित तरुणाला पकडून त्याला मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
समाधान आहिरे यांच्यावर बंदूक रोखणारा संशयित हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. प्रकाश लोंढे हे सध्या गोळीबार व खंडणी प्रकरणात तुरुंगात असून तुरुंगातूनच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. घडलेला संपूर्ण प्रकार आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोबाइलमध्ये शुट केला होता. तो व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला.
दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात समाधान आहिरे यांना धमकावण्यासाठी वापरण्यात आलेली ती बंदूक नव्हती तर बंदुकीसारखा दिसणारा लायटर होता. या प्रकरणात सातपूर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. सार्थक गोवर्धन याच्यावर बंदूक असल्याचे भासवून धमकावल्याप्रकरणी आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहिरे यांच्यावर संबधित तरुणाला मारहाण करणे आणि मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.