Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse : भाजपच्याही एक पाऊल पुढे, निवडणूक तयारीसाठी दादा भुसेंची खास रणनिती

Nashik elections : नाशिकमध्ये महायुती म्हणून लढायचे की स्वबळावर हा निर्णय जरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असले तरी, स्वबळावर लढण्याची वेळ आल्यास त्या दृष्टीने दादा भुसे रणनिती आखत आहेत.

Ganesh Sonawane

Shiv Sena Nashik : नाशिकमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या खांद्यावर सोपवलेली आहे. त्यादृष्टीने त्यांनी शिवसैनिकांना नाशिक महापालिका व जिल्हा परिषदेवर भगवा फडकावण्यासाठी तयारीला लागावे अशा सूचना केल्या आहेत. यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. पंरतु प्रत्येक जागेवर आपल्या पक्षाचा उमेदवार तयार ठेवावा, असे निर्देश भुसेंनी दिले आहे.

रविवारी नाशिकमधील मायको सर्कल येथील शिवसेना (शिंदे गट) कार्यालयात पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्ते, नेते व पदाधिकाऱ्यांना भुसे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री शिंदेंनी महायुती म्हणून निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यासंदर्भातील अंतिम निर्णय ते घेतील. पण, निवडणुकीची तयारी म्हणून प्रभागातील प्रत्येक जागा तसेच गट-गणासाठी आपल्या पक्षाचा उमेदवार तयार ठेवावा अशा सूचना त्यांनी केल्या.

दरम्यान शिवसेना नोंदणी अभियानाचा अहवाल पक्षाकडे सादर करण्याच्या सूचना मंत्री भुसेंनी केल्या. तसेच या अभियानात ज्यांनी गांभीर्याने जबाबदारी पार पाडली आहे, त्यांचा निवडणुकीत विचार केला जाईल असेही भुसे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असून, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आता आमची असल्याचे ते म्हणाले.

नाशिकमध्ये भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. त्यादृष्टीने भाजपने स्वबळाचा विचार केल्यास आपलीही तयारी असली पाहीजे यादृष्टीने शिवसेनेने आता पावले उचलल्याचे दिसत आहे. दादा भुसे यांनी दिलेल्या सूचना त्याच तयारीचा भाग असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमध्ये विरोधी पक्षातील नेते गळाला लावण्यासाठी सुरुवातीपासून शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळालेली आहे.

यावेळी पक्षाचे सचिव राम रेपाळ, उपनेते अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे, पक्षाचे नेते विजय करंजकर, नाशिकचे संपर्कप्रमुख विलास शिंदे, शहरप्रमुख प्रवीण तिदमे, अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी पक्षाचे नवनियुक्त संपर्कप्रमुख विलास शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रांतील युवकांचा युवासेनेत पक्षप्रवेश पार पडला. पक्षाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT