Manikrao Kokate, Bachchu Kadu Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bachchu Kadu : बच्चू कडू मशाल घेऊन कोकाटेंच्या घरावर धडकले पण ते भेटलेच नाहीत; शेवटी फोनवरून दिलं कर्जमाफीबाबतचं आश्वासन, नेमकं काय घडलं?

Bachchu Kadu Farm Loan Waiver Protest : शेतकरी कर्जमाफीचा विषय सरकारच्या गळ्याचा फास होण्याची स्थिती आहे. या प्रश्नावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी काल कृषिमंत्री आणि प्रशासनाला चांगलेच जेरीस आणलं आहे. रात्री झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची देखील झोप उडाली.

Sampat Devgire

Nashik News, 12 Apr : शेतकरी कर्जमाफीचा विषय सरकारच्या गळ्याचा फास होण्याची स्थिती आहे. या प्रश्नावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी काल कृषिमंत्री आणि प्रशासनाला चांगलेच जेरीस आणलं आहे. रात्री झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची देखील झोप उडाली.

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यांनी शुक्रवारी रात्री नऊला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी मशाल मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. या आंदोलनाने कृषिमंत्री आणि पोलिस दोघांचीही चांगलीच अडचण केली.

रात्री नऊला बच्चू कडू यांनी कृषी मंत्र्यांच्या घरावर मशाल मोर्चा काढण्याचे सांगितले. यावेळी कृषी मंत्री नेमके कुठे आहेत ही माहिती कोणालाच समजत नव्हती. त्यामुळे सुरूवातीला शहरातील विषय मळा येथील घराकडे बच्चू कडू यांचा मोर्चा निघाला. नंतर नयनतारा सोसायटीकडे हे सर्व कार्यकर्ते गेले.

सोसायटीच्या प्रवेशद्वारावर मशाली पेटवत त्यांनी राज्य शासन आणि कृषिमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दिव्यांगांना फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, माणिकराव कोकाटे खाली या आंदोलकांची भेट घ्या, या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पोलिसांची परिस्थिती हाताळताना तारांबळ उडाली.

यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून कृषिमंत्री कोकाटे यांच्याशी कडू यांचे फोनवर बोलणे करून दिले. मात्र, त्याने कडू यांचे समाधान झाले नाही. त्यांनी कृषिमंत्र्यांची भेट घेतल्याशिवाय परत जाणार नाही असे स्पष्ट केले. त्यावर कृषी मंत्री कोकाटे यांनी आपण सिन्नर येथे आहोत असे सांगितले. तेव्हा कडू यांनी आम्ही सिन्नरला येतो असा हट्ट केला. मध्यरात्री घडलेल्या या सर्व वादात प्रशासन आणि स्वतः कृषिमंत्री यांचीही तारांबळ उडाली.

यावेळी कृषी मंत्री कोकाटे यांनी राज्य शासन नियमाप्रमाणे कर्जमाफीचा निर्णय घेईल, असे आश्वासन दिले. यावेळी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांसह, गणेश निंबाळकर, जिल्हा अध्यक्ष शरद शिंदे, अनिल भडांगे सागर निकाळे दत्तू बोडके, गणेश काकुळदे, रुपेश सोनवणे, श्याम गोसावी, अमोल फडतरे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला होता.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT