Amit Shah Raigad Tour : रायगडावर पाऊल ठेवताच अमित शाह करणार मोठी घोषणा, उदयनराजेंची 'ती' मागणी मान्य?

Amit Shah May Fulfill Udayanraje’s Demands : छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी किल्ले रायगडावर येत आहेत.
Udayanraje Bhosale  Amit Shah
Udayanraje Bhosale Amit Shahsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त गृहमंत्री अमित शाह आज (शनिवार) रायगडावार शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत. रायगडवार आल्यानंतर ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी कायदा करण्यात यावा, शिवाजी महाराजांचे दिल्लीत स्मारक व्हावे, अशा मागण्या उदयनराजे भोसले यांनी अमित शाह यांच्याकडे केल्या होत्या. या मागण्यांविषयी अमित शाह घोषणा करतील, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

Udayanraje Bhosale  Amit Shah
Bagal Group Politic's : निवडणुकीतून माघार घेतलेल्या बागल गटाच्या हाती ‘आदिनाथ’च्या सत्तेची चावी!

शुक्रवारी (ता.11) महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी उदयनराजे भोसले हे पुण्यातील महात्मा फुले स्मारक येथे आले होते. तेथे पत्रकारांशी संवाद साधताना अमित शाह आपल्या मागण्यांविषयी घोषणा करणार असल्याचे संकेत दिले. ते म्हणाले, शिवाजी महाराजांची पुण्यतिधी आहे. शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या विषयी अनुद्गार काढणाऱ्यांवर कारवाई केली जावी. या गुन्ह्यात त्यांना विनावाॅरंट अटक व्हावी, अशी आमची मागणी आहे. याविषयी मी अमित शाह यांना निवेदन दिले आहे.

मुलींची पहिला शाळा प्रतापसिंहराजेंनी सुरू केली...

उदयनराजे यांनी मुलींची पहिली शाळा थोरले प्रतासिंहराजे यांनी आपल्या साताऱ्यातील वाड्यात काढलाचे सांगितले तसेच त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचा दावा देखील त्यांनी केले. ते म्हणाले जी शाळा प्रतापसिंहराजेंनी राजवाड्यात सुरू केली होती पुढे त्या शाळेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील प्राथमिक शिक्षण घेतले.

राजभवनात स्मारक उभारा

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी जलपूजन केले होते. मात्र, पर्यायवरणाचा प्रश्न असेल तर राजभवनामध्ये स्मारकर उभारण्याच यावे, असे उदयनराजे भोसले म्हणाले. राजभवनाची 48 एकर जमीन आहे. राजपालांना राहण्याची जागा लागतेच किती? त्यामुळे राजभवनात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले जावे आणि राजभवन समुद्राला लागूनच आहे.

शहा स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी

अमित शहा आपल्या रायगडाच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्यातील घरी स्नेहभोजन करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

Udayanraje Bhosale  Amit Shah
Suresh Dhas Dhananjay Munde meeting : 'होय, गेलो होतो धनंजय मुंडेंना भेटायला'; आमदार धस म्हणाले, 'तरीही देशमुख कुटुंबिय अन् मस्साजोग गावकरी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com