Vijay Wadettiwar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : गिरीश महाजनांना खूश करण्यासाठी शेतकऱ्यांना मारहाण, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर तिखट शब्दात हल्ला

Nashik Farmer Lathicharge : कुंभमेळ्याच्या रिंग रोड साठी जबरदस्तीचे भूसंपादन सुरू आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांच्या घरात घुसून पोलिसांनी लाठीमार केला. शेतकऱ्यांना बेघर केल्याने प्रकरण चांगलेच तापले आहे.

सरकारनामा ब्युरो

Nashik News : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रिंग रोड केला जात आहे. त्यासाठी काल सकाळी मुंगसरे येथे घरात घुसून शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला. पोलिसांनी महिलांनाही सोडले नाही. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या विषयावरून राज्य सरकारवर तिखट शब्दात हल्ला केला. गोठ्यात गाय, अंगणात तुळस आणि देव्हाऱ्यात देव जपणाऱ्या शेतकऱ्यांवर अमानुष लाठी हल्ला झाला. हा हल्ला शेतकऱ्यांवर मोठा आघात आहे, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना भल्या पहाटे घरात घुसून बेघर करणे आणि लाठीमार करणे कोणत्या नियमात बसते? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी केला. सरकारला प्रश्न करणारी पोस्ट देखील त्यांनी 'एक्स' वर केली आहे.

या हल्ल्यातून सरकारचे खरे स्वरूप उघड झाले आहे. हे सरकार शिवरायांच्या नाही तर मुघलांच्या विचाराने चालत आहे. अशा तिखट शब्दात फडणवीस सरकारला त्यांनी सुनावले आहे.

नाशिक मधील शेतकऱ्यांना व्हाट्सअप वर उद्या सकाळी साडेनऊला महसूल जमीन मोजणी होईल असा संदेश टाकण्यात आला होता. प्रत्यक्षात शिकाऊ आयएएस अधिकाऱ्याने सातलाच कारवाई सुरू केली. या आतातायीपणाच्या कारवाईने हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना खुश करण्यासाठी नाशिकचे सबंध प्रशासन काम करीत आहे. त्यासाठीच नियम आणि कायदे धाब्यावर बसून शेतकऱ्यांवर अत्याचार झाला. याबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही वडेट्टीवार म्हणाले.

या कारवाईचे नेतृत्व करणारे अधिकारी आणि लाठीमार करणाऱ्या पोलिसांचे तातडीने निलंबन करण्यात यावे. बळीराजाची जमीन बळजबरीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया थांबवावी. कुंभमेळ्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर नांगर फिरवू नका, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT