Tukaram-Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tukaram Munde: गुटखा माफियांना तुकाराम मुंढेंची धास्ती! नाशिकमध्ये कारवाईच्या भीतीने गोण्या भरून माल फेकला रस्त्यावर....

Nashik FDA Tukaram Munde Drive against vendors sellers threw gutkha on streets-तुकाराम मुंडे इफेक्ट; प्रशासन नाशिक शहरात गुटखा विक्रेत्यांच्या विरोधात लागले कामाला

Sampat Devgire

Nashik Crime: महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे. मात्र राज्यभर त्याची सर्रास विक्री सुरू होती. विक्रेते त्यातून मोठी कमाई करीत असल्याने मालामाल झाले होते. मात्र आता प्रशासनाने त्या विरोधात मोहीम उघडल्याने विक्रेते चांगलेच धास्तावले आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार तुकाराम मुंडे यांनी हाती घेतला. त्यानंतर अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यात आले. प्रशासन आणि अधिकारी आयुक्तांच्या शिस्तीमुळे दिवस रात्र कामाला लागल्याचे दिसून आले. 

नाशिक शहरात लगतच्या गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा पुरवठा केला जातो. सीमेवरील काही गावांमध्ये गुटखा निर्मितीचे कारखाने आहेत. त्यातून एक सराईत विक्रेत्यांची यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्यामुळे सगळीकडे सर्रास त्याची विक्री होत होती. 

आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गुटखा विक्री बाबत गंभीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. विक्रेत्यांवर धाडसत्र सुरू करण्यात आले. प्रमाणावर गुटखा जप्त करण्यात आला होता. पुढच्या टप्प्यात विक्रेत्यांवर 'मोका' सारखी कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता.

अन्न व औषध प्रशासनाने गुटखा विक्री विरुद्ध धडक मोहीम सुरू केली. गुटखा माफी यांचे धाबे त्यामुळे दणाणले. लपून-छपून गुटखा विक्री द्वारे मोठी कमाई करणाऱ्यांनाही धडकी भरली. त्याची प्रचिती नुकतीच प्रशासनाला नाशिक शहरात आली.

शहरातील आडगाव नाक्याकडून द्वारका चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर कंडमवार पूल येथे गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूच्या पुढे असलेल्या गोन्या फेकून देण्यात आल्याचे आढळले. याबाबत पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला माहिती मिळतात त्यांनी कारवाई केली. 

मात्र या फेकून दिलेल्या गुटखा व तंबाखूच्या गोण्या आणि माल कोणाचा याबाबत चौकशी करूनही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. कारवाईचा ससे मिरा टाळण्यासाठी धास्तावलेल्या विक्रेत्यांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. ही बातमी समजतात परिसरात खळबळ उडाली आहे. 

सध्या अन्न व औषध प्रशासनाची ही मोहीम समाज माध्यमांवरही चर्चेचा विषय आहे. युवकांनी याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रयत्न करू नये आणि कुटुंबीयांची विनंती व पाठपुरावा होऊ नये अनेकांना गुटखा सोडता आला नव्हता. मात्र सध्या बाजारात त्याची विक्री बंद झाल्याने अनेक युवकांचे व्यसन सुटले, अशा प्रतिक्रिया येत आहेत.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT