Ashok Kharat Women Abuse: कॅप्टन अशोक खरात याची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे. त्याच्या विरोधात दाखल महिला अत्याचाराचे गंभीर प्रकरण आहे. यामध्ये भीती दाखवून कोट्यावधींची माया जमविल्याचे प्रकरण आहे. अशोक खरातच्या अत्याचाराच्या तक्रारींची चौकशी विशेष तपास पथक करीत आहेत. तेजस्वी सातपुते या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत सूचना केल्या आहेत.
अशोक खरात याने असंख्य महिलांना तांत्रिक आणि जादूटोणा या माध्यमातून फसवले. त्यातून मोठ्या प्रमाणावर पैशांची वसुली झाली. राजकीय नेते देखील यामध्ये गुंतले आहेत. अशोक खरात यांनी आपली पत्नी कल्पना आणि मुलगी हिच्या नावावर 40 ठिकाणी शेकडो कोटींच्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. याप्रकरणी चौकशीसाठी पत्नी कल्पना हिला प्राचारण करण्यात आले होते. तेव्हापासून ती फरार झाली आहे.
फरार पत्नी कल्पना अशोक खरात हिच्या विरोधात शिर्डी येथे गुन्हा दाखल आहे. यामध्ये कोपरगाव येथील समता पतसंस्थेत खाती उघडण्यात आली होती. ही खाती बनावट असल्याचा संशय आहे. त्यातील सर्व पैसे एकाच दिवशी काढण्यात आल्याने पोलीस त्याची चौकशी करीत आहे. समता पतसंस्थेतील 58 खाती अशोक खरात याने परस्पर लाभार्थींचे कागदपत्र जमवून उघडली होती, असा आरोप आहे. हे पैसे पत्नी कल्पना खरात हिच्या माध्यमातून गुंतवण्यात आले. त्यासाठी शिर्डी पोलिसांनी कल्पना खरात हिला चौकशीसाठी पाचरण केले आहे.
गेली काही दिवस फरार असलेल्या कल्पना अशोक खरात हिच्या विरोधात कायद्याचा पाश आवळला जात आहे. त्यामुळे कल्पना खरात ही नाही आता अटक टाळण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. तिने न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी याचिका दाखल केली.
या याचिकेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी 16 एप्रिलला होणार आहे. बेकायदेशीर व खाजगी सावकारीचे हे प्रकरण असल्याने कल्पना खरात हिच्या अटकेची शक्यता आहे.
एक जमिनीची फसवणूक करून शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्यात आली. कल्पना खरात हिच्या नावाने या मालमत्ता खरेदी करण्यात आले आहेत. शिर्डी, काकडी, नाशिक शहरातील विल्होळी आणि अन्यत्र या मालमत्ता खरेदी केलेले आहेत. कल्पना खरात तिला अटक करण्यासाठी शिर्डी पोलिसांनी जोरदार मोहीम राबविली आहे.
नाशिकच्या तिसऱ्या गुन्ह्यात देखील खरातचे कुटुंबीय विविध गुंतवणुकीच्या पैशांमुळे टार्गेटवर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.