

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाच्या लाडकी बहीण योजनेबाबत नवी घडामोड चर्चेत आहे. मार्च महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक महिला चिंतेत होत्या. एप्रिल महिन्याचाही बराच कालावधी उलटून गेला, तरी पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.
लाभार्थी महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये एकत्रितपणे जमा होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हे पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी शासन स्तरावर हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरण्याचे कारण नाही.
दरम्यान, या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे. ज्या महिलांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नाही किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शासनाने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढवली आहे. ही संधी शेवटची असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अनेक महिलांकडून ई-केवायसी करताना काही चुका झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः “कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का?” या प्रश्नाचे चुकीचे उत्तर भरल्यामुळे काहींचे हप्ते थांबले आहेत. या तक्रारी लक्षात घेऊन सरकारने दुरुस्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
लाभार्थींनी अधिकृत संकेतस्थळ https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जाऊन आपली माहिती तपासून आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे आहे. निर्धारित वेळेत प्रक्रिया पूर्ण केल्यासच पुढील हप्ते खात्यात जमा होतील. अन्यथा, अपात्र ठरलेल्या महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. थोडी प्रतीक्षा केल्यानंतर लाडक्या बहिणींना दुहेरी आनंद मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.