Nashik Police News: नाशिक शहरातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारांच्या वर्चस्वातून होणारे वाद वाढले आहेत. राजकीय नेत्यांच्या मागे लागलेले पोलीस गुन्हेगारी रोखण्यात मात्र यशस्वी ठरल्याची चर्चा त्यामुळे गुन्हेगारांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
नाशिक रोड परिसरातील फर्नांडिस वाडी येथे रोहित डिंगम आणि राहुल उज्जैनवाल या गुन्हेगारांमध्ये परस्परांवर गोळीबार झाला. याबाबत पोलीस घटनास्थळी जाईपर्यंत गुन्हेगार पसार झाले होते. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. मध्ये दोन बंदुकीतून आठ राऊंड फायर झाल्याचे उघड झाले आहे.
या दोन्ही गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत. या टोळ्यांतील वर्चस्ववादावरून परस्परांवर गोळीबाराची घटना झाली. या घटनेने थेट पोलिसांना आव्हान दिले आहे. संबंधित गुन्हेगार सराईत असून त्यांच्याकडे गावठी रिवाल्वर होते. यातील काही गुन्हेगारांनी दोन वर्षांपूर्वी सिडको भागात शिवसेनेशी संबंधीत प्रकरणातही गोळीबार केल्याची चर्चा आहे.
गेली काही दिवस शहरातील सिडको, सातपूर आणि पंचवटी भागात सातत्याने हत्या घडत आहेत. यासंदर्भात बहुतांशी सराईत गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हे सर्व प्रकार घडत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे.
नाशिक रोडला झालेल्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या. त्यात एका स्विफ्ट कारसह दोन रिवाल्वर आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. इरशाद मोहम्मद अली चौधरी याने हा गोळीबार केल्याचे बोलले जाते.
राहुल उज्जैनवाल, रोहित डिंगम उर्फ माले, टक्या उर्फ सनी पगारे, बारक्या उर्फ श्रीकांत वाकोडे, सुशांत नाठे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
शहरातील सिडको, सातपूर, नाशिक रोड या ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये गावठी बंदुकांचा वापर करण्यात आला. या गुन्हेगारांना या गावठी बंदूक कोण आणि कुठून पुरवल्या जातात? त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. याबाबतच्या गुन्ह्यांचा तपास कसा करावा याच्या सूचना करताना बंदुकांचा स्वतंत्र तपास करण्याचा सूचना असतात.
बहुतेक प्रकरणात पोलीस याबाबत मुळाशी जाण्याचे टाळतात. त्यामुळे गावठी बंदुका उपलब्ध करणारे नाम निराळे राहतात. त्यातून गुन्हेगारांचे मात्र पावते. आता गुन्हेगारांनी थेट पोलिसांनाच आव्हान देण्याचे काम सुरू केले आहे.
शहरातील आणि परिसरातील नागरिक या घटनांनी भयभीत आहेत. दहशत निर्माण करणे यामध्ये गुन्हेगार यशस्वी होऊ लागले आहेत. हे चित्र कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत असल्याचे द्योतक नाही. गावठी रिवाल्वर आणि अन्य शस्त्रांचे पुरवठादार व त्याचे मूळ काय आहे हे शोधल्याशिवाय या गुन्हेगारीला आळा घालणे अवघड होऊ लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.