Maharashtra politics : मी कुंभमेळा मंत्री आहे, जलसंपदा मंत्री आहे, दोन्ही कामांची जबाबदारी माझ्याकडे आहे, तसेच आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी देखील माझ्याकडे आहे. पुढं कुंभमेळा आहे. त्याचे नियोजन, व्यवस्थापन योग्यपद्धतीने झाले पाहिजे. गेल्या कुंभमेळ्याच्या नियोजनावेळी पालकमंत्रीपद माझ्याकडे होते. त्यावेळी उत्तम समन्वय साधता आला.
आता देखील कामाच्या नियोजनात समन्वय साधण्यासाठी पालकमंत्रीपद महत्त्वाचे ठरले असते, असे सांगून पालकमंत्रीपदाचा तिढा सुटून पदाची माळ आपल्याच गळ्यात पडणार असल्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. मंत्री महाजन यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये सत्तेत असलेली एकनाथ शिंदे यांची शिवसेना नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत बॅकफूटवर गेल्याचे दिसते.
नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावर महायुतीमधील (Mahayuti) भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी व्यक्त केली. नाशिकमध्ये कुंभमेळा येऊ घातला आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदावर दावा भाजपने कायम ठेवला आहे. पण शिवसेनेने पालकमंत्रीपदावर दावा कायम ठेवला आहे. यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वीच नाशिकचा (Nashik) पालकमंत्रीपद लवकरात लवकर आम्ही जाहीर करू, जे व्हायचे ते लवकरात होईल, मी होईल, असं मी म्हटलेलो नाही. पण मी कुंभमेळा मंत्री आहे, जलसंपदा मंत्री आहे, दोन्ही कामांची जबाबदारी माझ्याकडे आहे. तसेच आपत्तीव्यवस्थापनाची जबाबदारी सुध्दा माझ्याकडे आहे, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.
कुंभमेळा आहे. म्हणून मी जर त्या ठिकाणी पालकमंत्री असलो, तर अधिक गती देता येईल, असे माझे म्हणणे आहे. गेल्या वेळी कुंभमेळा मंत्री सुध्दा होतो आणि पालकमंत्री सुध्दा होतो. त्यामुळे समन्वय चांगल होऊ शकतो, एवढेच माझे म्हणणं आहे, असे मंत्री महाजन यांनी म्हटले.
मंत्री महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना, त्यांचे फक्त जमिनीचे भाव वाढवा, एवढेच म्हणणे आहे. तिकडे संपादीत होत असलेल्या जमिनीसाठी, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. स्वत: वर्षभरापूर्वी त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे, तिकडे भाव वाढवून द्या, अशी त्यांची मागणी आहे, त्याशिवाय त्यांचा दुसरा काही प्रश्न दिसत नाही, असा टोला लगावला.
अमळनेर शैक्षणिक घोटाळ्यावर बोलताना, मागच्या काळात निश्चित घोळ झालेला आहे, हे उघड सुध्दा झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा आदेश दिला आहे. त्यानंतर किती घोळ आहे, हे समोर येईल, सखोल आणि कडक चौकशी होणार आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.