Girish Mahajan statement : बाप-बेट्यामध्ये, सासरा-सुनेमध्ये, तर भावा-बहिणींमध्ये मारामाऱ्या; मंत्री महाजनांचा इशारा नेमका कोणाकडं?

BJP Girish Mahajan political remarks Jalgaon Collector Office Guardian Minister Gulabrao Patil : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विकास योजनेचा कार्यक्रमात भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य केले.
Girish Mahajan 1
Girish Mahajan 1Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विकास योजनेचा कार्यक्रमात भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

घरातल्या घरात मारामाऱ्या सुरू असून, राज्यात सध्या कुठे बाप-बेट्यामध्ये, सासरा-सुनेमध्ये, तर कुठे भाऊ-बहिणींमध्ये ही स्थिती सुरू असल्याकडे मंत्री महाजन यांनी लक्ष वेधले. यावेळी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते. मंत्री महाजन यांच्या या भाष्यामागे नेमका रोख कोणाकडे होता? याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन करताना, फक्त काम करत राहा. चांगल काम करा. पहिल्यांदा सरपंच झाल्यानंतर मी एवढं चांगल काम केले की, लोक जोडली गेली. पुढं 1994-95 मध्ये, जेव्हा विधानसभा लागली, तेव्हा माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील एका सामान्य शिक्षकांच्या मुलाला लोकांनी मला पहिल्यांदा आमदार केलं, याची आठवण मंत्री महाजन यांनी करून दिली. आता सातव्यांदा मी विधानसभा निवडणुकीत विजयी झालो आहे. भाजपमध्ये (BJP) सर्वांत वरिष्ठ आमदार मी आहे, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

Girish Mahajan 1
Sadhvi Pragya Singh Thakur : मोठी बातमी! बॉम्बस्फोट प्रकरणाची पार्श्वभूमी; भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह 'या' कारणासाठी मालेगावाला जाणार

प्रामाणिकपणे काम करत राहा, केवळ माझचं स्वाहा, असं करत राहाल तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही, तुम्ही जर काम चांगले काम केलं तर तुम्हाला सुध्दा संधी आहे, असे सांगताना सभागृहात उपस्थित असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना तुमच्या मतदारसंघातील कार्यकर्ते इथं आहे ना, असा चिमटा काढला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

Girish Mahajan 1
Shivsena vs BJP : ठाकरेंच्या पठ्ठ्यानं टायमिंग साधलं, फडणवीसांचा जुना व्हिडिओ काढला बाहेर

राज्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना, घरातल्या घरात मारामाऱ्या सुरू राहतात, याकडे मंत्री महाजन यांनी लक्ष वेधले. राज्यात सध्या कुठे बाप-बेट्यामध्ये, कुठे सासरा-सुनेमध्ये, तर कुठे भावा-बहिणींमध्ये मारामाऱ्या सुरू आहेत, याकडे मंत्री महाजन यांनी लक्ष वेधले.

आपण जर चांगल काम केलं, तर लोकांच्या नजरेतून सुटत नाही. लोक सुध्दा त्यांच प्रिडिक्शन करत असतात. लोकांचे आपल्याकडे लक्ष राहत की, आपण काय करतो आहे. त्यामुळे चांगल काम करत राहा, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केलं. पण राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना केलल्या मारामाऱ्याचा उल्लेख नेमका कोणाकडे इशारा करणारा होता, याची चर्चा आता रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com