Nashik News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : प्रसूती वेदनेत तळमळणाऱ्या महिलेच्या मदतीला शिवसैनिक देवा सारखे धावून आले, नशेत झिंगाट असलेल्या डॉक्टरला दिला चोप

Pregnant woman ignored in labour, drunk doctor in Nashik hospital, Shiv Sainiks intervene with assault : घटनेनंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांकडे रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधितांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.

Ganesh Sonawane

Nandgaon News : नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात (जि. नाशिक) दाखल झालेल्या एका आदिवासी गर्भवती महिलेला दिवसभर उपचाराशिवाय ताटकळत ठेवण्यात आलं. प्रकृती गंभीर झाल्यानंतर मद्यधुंद डॉक्टरांनी तिची नॉर्मल डिलिव्हरी होणार नसल्याचं सांगून सिझेरियनसाठी दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला, यामुळे संतप्त शिवसैनिकांनी डॉक्टरला व अन्य कर्मचाऱ्यांना चोप दिला.

घटनेनंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांकडे रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधितांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्या चार जणांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिकांचा संताप शांत झाला.

जामदरी येथील एकोणवीस वर्षांची आदिवासी गर्भवती सोनाली आकाश मोरे ही प्रसूतीसाठी दिवस पूर्ण झाल्याने सकाळी सहा वाजता नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अद्याप वेळ झालेली नाही, असं सांगत रक्तासाठी दोन हजार रुपये मागितले. कुटुंबीयांनी रक्कम दिल्यानंतरही प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यावर तिच्याकडे दुर्लक्षच करण्यात आलं.

ही माहिती मिळताच युवासेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांनी शिवसैनिकांसह तात्काळ ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. तेथे उपस्थित असलेले डॉ. शांताराम राठोड व काही कर्मचारी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळले. गर्भवती महिलेला दुसऱ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला का देण्यात आला, याची विचारणा शिवसैनिकांनी केली. मात्र डॉ. राठोड उत्तर देण्यास असमर्थ असल्याचे दिसल्यावर संतप्त शिवसैनिकांनी डॉक्टरांसह इतर मद्यधुंद कर्मचाऱ्यांना चोप दिला. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले.

सिव्हिल सर्जन डॉ. चारुदत्त शिंदे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित मद्यधुंद डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर इतर नागरिकांनीही रुग्णालयातील पूर्वीच्या तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली आहे. आता मद्यधुंद डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर नेमकी कारवाई कधी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महिलेची नॉर्मल डिलिव्हरी (Nashik News)

महिलेची तब्येत बिघडताच, तिचं नॉर्मल डिलिव्हरी होणं शक्य नाही असं सांगून सिझेरियनसाठी दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्यानंतर डॉ. तुसे यांना बोलावण्यात आलं. त्यांनी सोनालीची प्रसूती यशस्वीपणे केली असून, तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि कन्यारत्ने झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT