Devendra fadnavis Politics: देवाभाऊंच्या त्या घोषणेने सहकारातील नेते धास्तावले... संस्थांपुढे येणार अडचणी!

Devendra fadnavis; CM Devendra Fadnavis' announcement has made co-operative leaders cautious, problems may increase -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील कार्यक्रमात केली होती घोषणा
Devendra fadnavis
Devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News: विरोधी पक्षांकडून कर्जमुक्तीच्या प्रश्नावर राज्य शासनाला टार्गेट करण्यात येत आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी या विषयावर नुकतेच अन्नत्याग आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे महत्त्वाचे विधान केले आहे.

पुणे विद्यापीठात वारकऱ्यांची संबंधित झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर मतप्रदर्शन केले. राज्य शासन कर्जमाफी करण्यास कटिबद्ध आहे. मात्र त्यासाठी काही नियम आणि कार्यपद्धती असतात. त्याचे पालन करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय होईल असे म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या घोषणेने सहकार क्षेत्रातील प्रस्थापितांना धसका बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे थकबाकीदार शेतकरी कर्ज भरण्याचे लांबणीवर टाकण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आधी वेगळी भूमिका घेतली होती.

Devendra fadnavis
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांच्या 'हंड्रेड प्लस'चा आता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानेही घेतला धसका?

कर्जमाफी होणार या अपेक्षेने शेतकरी कर्ज भरण्याचे टाळण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम जिल्हा बँकांच्या वसुलीवर होऊ शकतो. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केलेल्या अन्य संस्थांनाही वसुलीसाठी अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने सहकार क्षेत्रातील नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.

Devendra fadnavis
Nilesh Lanke : खासदार निलेश लंके जमिनीवर झोपले, जिल्हा परिषदेच्या शाळेत मुक्काम! नेमकं काय घडलं?

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विविध प्रचार सभांमध्ये लाडकी बहीण आणि लाडका भाऊ तसेच लाडका शेतकरी असा उल्लेख वारंवार करण्यात आला होता. विज बिल माफी पासून तर पाहिजे ते माफ असा संदेश जाणीवपूर्वक देण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही ठिकाणी कर्जमाफीचा उल्लेख केला होता.

विधानसभा निवडणुकीतील या प्रचाराचा विरोधी पक्षांनी सध्या लाभ उठविला आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले. त्याला काँग्रेस सह विविध पक्षांनी पाठिंबा दिला. राज्यभर शेतकरी कर्जमुक्तीसाठी वातावरण निर्माण होऊ लागले. त्यामुळे शासनाला तीन वेळा मंत्र्यांमार्फत कडू यांच्याशी चर्चा करावी लागली होती.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकरी कर्जमाफीची थेट मागणी केली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याच राजकीय मुद्द्याला शांत करण्यासाठी योग्य वेळी कर्जमाफी असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनीच कर्जमाफी होणार असे म्हटल्याने थकबाकीदार तसेच सहकारी संस्थांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांत हा संदेश गांभीर्याने घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याचा फटका राज्यातील सहकारी आणि जिल्हा बँकांना बसणार आहे. मुळे सहकार क्षेत्र अडचणीत येण्याची शक्यता असल्याने नेत्यांनी त्याचा धसका घेतला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com