Sanjay Yenpure appointed as Nashik IG: राज्यातील पोलिस प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. पोलिस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांसह विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक तसेच विविध महत्त्वाच्या पदांवरील २३ अधिकाऱ्यांना नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची पाच दिवसांपूर्वी राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली केली होती. त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु पडवळ यांची पाचच दिवसांत पुन्हा सुधारित बदली करण्यात आली आहे.
प्रवीण पडवळ यांची नाशिक परिक्षेत्रातून व्हीआयपी सुरक्षा, दादर येथे बदली करण्यात आली आहे. तर संजय येनपुरे यांची नाशिक परिक्षेत्रात नियुक्ती केली आहे. पडवळ यांच्या रिक्त झालेल्या जागेवर संजय येनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे संजय येनपुरे हे नाशिकचे नवे आयजी असतील.
नाशिकचे अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांची बदली नागपूर येथे झाली आहे. त्यांच्या जागी अहिल्यानगर येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक विमला एम यांची नियुक्ती केली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची पोलिस उपायुक्त, मुंबई शहर येथे बदली झाली होती. त्यांची पुन्हा उपायुक्त ठाणे शहर येथे बदली झाली आहे.
प्रतीक्षाधीन शारदा राऊत यांना महिला अत्याचार प्रतिबंध विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांची नियोजन व समन्वयचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.
तर संदीप पाटील यांची अमरावती परिक्षेत्रातून नागपूरला विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे पंजाबराव उगले हे आता ठाणे शहराचे पोलिससह आयुक्त असणार आहेत. तर महेश पाटील हे आता अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.