Nashik IT company case News: नाशिकच्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत धर्मांतराचा प्रयत्न झाला. त्यासाठी महिलांचा छळ करण्यात आला. नोकरीतील असहाय्यतेचा गैरफायदा घेण्यात आला.
या प्रकरणी नाशिक शहरात सहा ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणावर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता आहे. NIA, ATS सोबतच CBI कडून लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाच्या चौकशीची होईल, असे सुत्रांनी सांगितले
यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे प्रतिक्रिया दिली. प्रकरणाची व्याप्ती अधिक असू शकते. नाशिकच्या अन्य कंपन्यांमध्ये काय सुरू आहे? याची देखील चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
नोकरीतील असहाय्यतेचा गैरफायदा काही वरिष्ठांनी घेतला. या महिलांना आणि युवकांना गोमांस खाण्यास भाग पाडले. नमाज पठण करून घेतले. हे सर्व संताप जनक आहे.
महाजन म्हणाले "धर्मांतरासाठी एखाद्या कंपनीत असे प्रकार होत असल्यास ते चिंताजनक आहे. नोकरीची आवश्यकता असल्याने अनेक ठिकाणी असे दबावाचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे यावर कायमचा बंदोबस्त आवश्यक आहे,"
या विषयांवर आमचे विरोधक वेगळीच भूमिका मांडतात. विधिमंडळात अतिशय जोरदार दावे करतात. बुवाबाजीचा संबंध थेट धर्माशी जोडतात. या प्रकरणाची शहनिशा करावी. यावर प्रतिक्रिया द्यावी, या शब्दात महाजन यांनी विरोधकांना डिवचले.
मंत्री महाजन यांचा रोख प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांवर दिसून आला. यासंदर्भात थेट पोलीस आयुक्तांची त्यांनी संपर्क केला. यातील कोणत्याही आरोपीला सोडता कामा नये, अशा सूचना त्यांनी केल्या. त्यामुळे पोलिसांच्या तपासाची व्याप्ती अधिक वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.