Nashik IT Company Case  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : ‘कॉर्पोरेट कंपनीत असं होत राहतं...’ पीडित हिंदू तरुणींनी मेल केला पण एचआरने दुलर्क्ष केलं... तपासात धक्कादायक माहिती उघड

Nashik IT Company Case : नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय IT कंपनीत हिंदू महिला व तरुणींचे लैगिंक शोषण व धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. नाशिकमधील या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

Ganesh Sonawane

Nashik IT Company Case : नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीत उघडकीस आलेले लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे प्रकरण हादरवणारं आहे. पोलिसांनी संशयित टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच याप्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

संबंधित संशयितांविरोधात पीडित हिंदू तरुणींनी कंपनीच्या एचआरकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. मात्र कंपनीच्या एचआर अश्विनी चैनानी हीने पीडित महिलांच्या तक्रारीची दखल न घेता संशयितांना पाठीशी घातलं. एचआरने ‘कॉर्पोरेट कंपनीत असं होत राहतं...’ असे म्हणत या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबधित एचआर अश्विनी चैनानी पसार झाली होती. पण पोलिसांनी तिला पुण्यातून ताब्यात घेतलं.

पोलिसांनी एचआर अश्विनीला ताब्यात घेत तीची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर सोडून दिलं. मात्र, या प्रकरणी अश्विनीला रीतसर नोटीस बजावण्यात येऊन तिची पुन्हा कसून चौकशी केली जाणार आहे. (Nashik News)

दरम्यान याप्रकणात आतापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ८ तरुणींनी पुढे येत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी काल सहा संशयितांना बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे देण्यात आला आहे. आतापर्यंत तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. नोकरीच्या मुलाखतीपासूनच हिंदू तरुणींना लक्ष्य केले जायचे. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार व विचित्र छळ केला जात. त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे एका तरुणालाही धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आल्याचे उघड झाले आहे.

संबंधित कंपनी ही एक बहुराष्ट्रीय आयटी कंपनी आहे. अशा रितीने कंपनीत संशयितांनी धर्मांतरासह महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार केल्याच्या घटनेने कंपनीचे धाबे दणाणले आहे. झाल्या प्रकारामुळे कंपनीचे अधिकारी तणावात आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल कंपनीच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली असून, पोलिसांना तपासाच्या अनुषंगाने सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबत कंपनीने तत्परता दर्शविली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT