Nashik Crime : लंगडत लंगडत बाहेर आला अन् हात जोडत तो 'नारा दिला'.. अत्याचारी रविंद्र एरंडेला नाशिक पोलिसांनी दाखवला हिसका (Video)

Ravindra Erande case : अशोक खरातसारखेच रविंद्र एरंडे याने महिलांचे लैगिंक शोषण केले. त्याने छुप्या पद्दतीने व्हिडीओ काढले. त्याचे तब्बल १२१ व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहे.
Ravindra Erande case
Ravindra Erande caseSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेला कथित अत्याचारी पत्रकार रविंद्र एरंडे हा पोलिसांना तपासात सहकार्य करत नव्हता. त्यामुळे नाशिक पोलिसांनी त्याला आपल्या खास शैलीत चौकशी करत हिसका दाखवला आहे. त्यानंतर मात्र तो पोपटा सारखा बोलू लागला.

अशोक खरात प्रमाणेच रवींद्र एरंडेचेही 100 हून अधिक अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. गोरगरीब महिलांना नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करून त्याने छुप्या पद्धतीने व्हिडिओ काढल्याचे तपासात समोर आले आहे.

सुरुवातीला रवींद्र एरंडे तपासात पोलिसांना सहकार्य करत नव्हता. मात्र, नाशिक पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला. मग काय क्राईम ब्रॅंच युनिट १ च्या कार्यालयातून बाहेर पडताना तो हात जोडून लंगडत लंगडत बाहेर आला अन् त्याने 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असा नारा दिला. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रवींद्र एरंडेला धड चालताही येत नसल्याचे दिसत आहे.

Ravindra Erande case
नाशिकचा दुसरा अशोक खरात, नक्की कोण आहे हा रविंद्र एरंडे?

दरम्यान, महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर रात्री उशीरा आणखी एक फसवणुकीचा गुन्हा झाला आहे. नोकरीचे आमिष दाखवून त्याने ९ जणांची 13 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यासाठी त्याने आदिवासी विभागात नोकरीचे आमिष दाखवले.

पोलिसांना चौकशीत रविंद्र एरंडे याच्या घरातून सरकारी नोकरीचे तीन बनावट नियुक्तीपत्रही जप्त केले आहे. या फसवणुकीत रवींद्र एरंडे याने आर्धी रक्कम रोख स्वरूपात स्वीकारल्याची माहितीही समोर आली आहे.

Ravindra Erande case
Ashok Kharat case : रुपाली चाकणकरांची बहीणही चौकशीच्या फेऱ्यात? 'चार' खात्यांमुळे प्रतिभा चाकणकर SIT च्या रडारवर

याआधी रविंद्र एरंडेविरोधात एका महिलेने अत्याचाराची तक्रार दिली होती. आता त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणी वाढणार आहे. पहिल्या गुन्ह्यात न्यायालयाने एरंडेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आता दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस त्याची पोलिस कोठडी आणखी वाढवून मागण्याची शक्यता आहे.

दरम्यान रवींद्र एरंडे याने अशोक खरातसारखेच कारनामे केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्या कार्यालयात अंधश्रद्धा पसरविणारे काही साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. ज्यात सापाची कात, पक्ष्यांचे अवयव, कवडी व काही कागदपत्रांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com