Police escort suspects linked to the Nashik IT scandal involving sexual exploitation and conversion racket as investigations intensify. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik IT Scandal : हिंदू मैत्रिणींसोबत जेवणं अन् लिप्स्टिक लावणं बंद; महिनाभर उपवास; नाशिकच्या IT कंपनीतील धर्मांतर प्रकरणाची इनसाईड स्टोरी आली समोर

Nashik IT company Sexual Exploitation & Conversion Racket : नाशिकमधील आयटी कंपनीत केवळ लैंगिक शोषण नव्हे तर तरुणींचे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर करण्याचा मोठा डाव या कंपनीत मागील अनेक वर्षांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती तपासातून उघडकीस आली आहे.

Jagdish Patil

Nashik News, 10 Apr : नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या प्रकरणाशी संबंधित संशयितांविरोधात पीडितांनी एचआरकडे तक्रार केल्यानंतरही त्याची दखल न घेतल्या प्रकरणी अश्विनी चैनानीला गुन्हेशाखेने पुण्यातून ताब्यात घेतलं आहे.

अशातच आता या प्रकरणाची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. केवळ लैंगिक शोषण नव्हे तर तरुणींचे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर करण्याचा मोठा डाव या कंपनीत मागील अनेक वर्षांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती तपासातून उघडकीस आली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार या प्रकरणातील संशयित आरोपींनी एका पीडितेचं असं ब्रेनवॉश केलं होतं की, तिने सलग दोन वर्षे महिना-महिनाभर उपवास पकडले होते. इतकंच नव्हे तर ही तरूणी आपल्या हिंदू मैत्रिणींसोबत जेवायला स्पष्ट नकार द्यायची अशी माहिती समोर आली आहे.

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे महिला वर्गाला आवडणारी आणि मेकअपचा एक भाग असलेली लिप्स्टिक लावणं या पीडीतेने जवळपास मागील एक वर्षापासून बंद केल्याचं उघडकीस आलं आहे. शिवाय संशयित आरोपी दानिश हा विवाहित असल्याचं पीडितेला तिच्या टीम लीडरने अनेकदा सांगितलं होतं. मात्र, आरोपीने पीडितेला आपल्या जाळ्यात अशा पद्धतीने ओढलं होतं की तिला टीम लीडरच्या सांगण्यावर विश्वासच बसत नव्हता.

या प्रकरणात केवळ तरूण नव्हे तर तरुणींचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. या तरुणी हिंदू तरुणींशी जवळीक साधून त्यांना एका विशिष्ट धर्माचा पोषाख परिधान करायला लावायच्या आणि तुला तो छान दिसेल असं सांगून त्यांना मानसिकरीत्या तयार करण्याचा प्रयत्न करत होत्या. यासाठी त्या कधीकधी जबरदस्तीही करायच्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, नाशिकमधील या कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 6 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संशयितांवर गुन्हे दाखल होताच कंपनीची एचआर आश्विनी अशोक चैनानी ही पसार झाली होती. मात्र, तिला पुण्यातून एसआयटीने तिला ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT