Girish Mahajan| Harshvardhan Sapkal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : पालकमंत्री गिरीश महाजनांचा कारभार टार्गेटवर : कुंभमेळ्याच्या कामात ‘टोकाचा भ्रष्टाचार, पारदर्शकतेचा अभाव’; चौकशीची मागणी

Harshvardhan Sapkal on Nashik Kumbh Mela : मंत्री गिरीश महाजन आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ हे दोघेही सोमवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. महाजन यांच्या याच दौऱ्यावरूनच सपकाळ यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Sampat Devgire

Nashik News, 25 Aug : नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांवरून आता राजकारण तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत, कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अपारदर्शकता असल्याचा आरोप केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

गिरीश महाजन आणि हर्षवर्धन सपकाळ हे दोघेही सोमवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी मंत्री महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. मात्र, महाजन यांच्या या दौऱ्यावरूनच सपकाळ यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव असून, या विकासकामांमध्ये टोकाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. या सर्व कामांची आणि सिंहस्थ कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

कुंभमेळ्याच्या विकासकामांबाबत आता न्यायालयानेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचे सांगत सपकाळ म्हणाले की, या प्रकरणात गिरीश महाजन यांनी प्रायश्चित्त घेतले पाहिजे. आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही.

कुंभमेळ्यासाठी करण्यात येत असलेला भरमसाठ आणि अनावश्यक खर्चही संशयास्पद असल्याची टीका सपकाळ यांनी केली. या खर्चातील केवळ एक टक्का निधी जरी राज्यातील शाळांसाठी खर्च केला असता, तरी शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली असती. मात्र, सरकारला शिक्षणाच्या प्रश्नांमध्ये अजिबात रस नसल्याचा आरोप करत, हा नेमका कसल्या कारभाराचा नमुना आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, विकासकामांच्या नावाखाली संपूर्ण नाशिक शहर खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचेही सपकाळ म्हणाले. शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मात्र, नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी मंत्री गिरीश महाजन या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून पळवाट शोधत असल्याची टीकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT