Devendra Fadnavis: मंत्री सावेंची छत्रपती संभाजीनगरच्या महापौरांसह मुख्यमंत्र्यांकडे धाव, साडेपाचशे कोटींच्या निधीची केली मागणी

Atul Save meets Chief Minister : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांवर स्वतंत्र प्रस्ताव दाखल करा, अशा सूचना दिल्या. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृहनेते गोविंद केंद्रे हे यावेळी उपस्थित होते.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Chhatrapati Sambhajinagar Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhahjinagar News : महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती आणि जिल्ह्यातील नेते मंत्री अतुल सावे यांनी सोमवारी(ता.24) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शहरातील चार सर्व्हीस रोडसाठी सुमारे ५५० कोटी, सोलार पार्कसाठी १५० एकर जमीन आणि छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी ४३ कोटींचा निधी शासनाकडून मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांवर स्वतंत्र प्रस्ताव दाखल करा, अशा सूचना दिल्या. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृहनेते गोविंद केंद्रे हे यावेळी उपस्थित होते. शहराची पाणीपुरवठा योजना रखडली तेव्हा महापौरांनी मुख्यमंत्र्याकंडे धाव घेत स्वतंत्र बैठकीची मागणी केली होती. फडणवीसांनीही तातडीने बैठक बोलावून पाणी योजनेला गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पुन्हा महापौरांनी मुख्यमंत्र्‍यांकडे धाव घेत निधीची मागणी केली आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महापालिकेच्याया शिष्टमंडळाने सह्याद्री गेस्ट हाऊस येथे भेट घेत शहरातील विकास कामांसाठी निधीची मागणी केली. बीड बायपास दोन्ही बाजूंनी सर्व्हीस रोड, जिजाऊ चौक (केंब्रीज) ते एपीआय कॉर्नर सर्व्हीस रोड, जळगाव रोडवर एका बाजूने सर्व्हीस रोड व पैठण रोडवर महापालिका हद्दीपर्यंत दोन्ही बाजूंनी सर्व्हीस रोड करणे गरजेचे असल्याचे महापौर समीर राजूकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

याठिकाणी महापालिकेने पाडापाडी करून रस्ते रुंद करून ठेवलेले आहेत. त्यामुळे सर्व्हीस रोडसाठी सुमारे ५५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी त्यांनी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाचे नुतणीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी काही निधी जिल्हा नियोजन समितीकडून घेतला जाणार आहे. उर्वरित ४३ कोटी रुपये महापालिकेला मिळावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Mahayuti Politics : महायुतीत वाद पेटला; भाजप नेत्याने सुनेत्रा पवारांना पत्र धाडताच, राष्ट्रवादीचा नेता थेट फडणवीसांच्या दरबारात...

शहराच्या नवी पाणी पुरवठा योजना व पथदिव्यांचे वीज बील कमी करण्यासाठी महापालिकेला सौर उर्जा प्रकल्प उभारयचा आहे. त्यासाठी शेतकी महामंडळाची गंगापूरची जागा महापालिकेला हवी आहे. या जागेसंदर्भात देखील मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. त्यांनी निधीसाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याची सूचना केल्याचे राजूरकर यांनी सांगितले.

तिसऱ्या भेटीत पदाधिकारी एकत्र

यापूर्वी स्थायी समिती सभापती मकरिये यांनी मंत्री अतुल सावे यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांना रस्ते कामसाठी निधीच्या मागणीचे निवेदन दिले होते. त्यानंतर महापौर राजूरकर यांनी पाणी योजनेसंदर्भात आढावा घेऊन योजनेला गती देण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सोमवारी मात्र सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत निधीची मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com