Anand Dave on Kumbh Mela 
उत्तर महाराष्ट्र

Anand Dave: "कुंभमेळ्यासाठी झाडं तोडता हे कुठलं हिंदुत्व"; आनंद दवेंनी सरकारला पकडलं कोंडीत

Anand Dave on Kumbh Mela: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्त साधुग्राम वसवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं तोडण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. त्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.

Amit Ujagare

Anand Dave on Kumbh Mela: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्त साधुग्राम वसवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं तोडण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. त्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. यापूर्वीच स्थानिक नाशिककरांनी याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

काही काळाच्या या सोहळ्यासाठी काही वर्षांपासूनची घनदाट झाडं तोडू नये, तपोवनाचं पावित्र राखावं अशा शब्दांत या नागरिकांना सरकारला सवाल केला आहे. त्यातच आता हिंदुत्ववादी नेते आनंद देवे यांनी देखील सरकारला झाडं तोडण्याच्या निर्णयावरुन जाब विचारला आहे. कुंभमेळ्यासाठी झाडं तोडता हे कुठलं हिंदुत्व आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

दवे म्हणाले, आम्ही इथं येण्याच्या आधी आयुक्तांना भेटलो. त्यांना झाड भेट दिलं, वृक्षतोडीवर त्यांच्याकडं उत्तर नाही तसंच सरकारसह मनपाकडंही याचं उत्तर नाही. हिंदू लोकांच्या नावावर काही मोजक्या हिंदूंच्या फायद्यासाठी हे सगळं सुरू आहे. झाडे तोडून जमिनी मिळवा, असं त्यांचं दिसतंय. त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. आम्ही झाडे लावून सरकारची जिरवू, जी नवी झाडं लावणार ती कुठं लावणार हे अद्याप निश्चित नाही. आम्ही यासाठी सभा घेणार आहोत. याबाबत नाशिकला पाहिलं आंदोलन हिंदू महासभेनं केलं आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी आम्ही आत्मदहन करू, पालिकेच्या विरोधात आंदोलन करू. कुंभमेळा व्हायला पाहिजे, पण त्यासाठी झाडे तोडू नका. काशी, पंढरपूर इथं कॉरिडॉरसाठी झाडं, मंदिर तोडली, हे कुठलं हिंदुत्व हेच आम्हाला कळत नाही. जिथं रामाचे पाय लागले तिथं कुऱ्हाडीचे घाव लावू नका. सरकारला आम्ही एकही झाड तोडू देणार नाही, अशा शब्दांत आनंद दवे यांनी सरकारला धारेवर धरलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT