PMC Election: सर्व्हेत भाजपच्या 50 जागा धोक्यात! मित्रपक्षांना विचारात घ्या अन्यथा...; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा

PMC Election: शिवसेनेची पुण्यात ताकद नसल्याचंही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे.
Citizens crowd PMC offices to file objections after large-scale errors and mismatched entries surface in Pune’s draft voter list ahead of the municipal corporation election.
Citizens crowd PMC offices Sarkarnama
Published on
Updated on

PMC Election 2025: महापालिका निवडणुकांसाठी आता सर्वच प्रमुख पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. महायुतीमध्ये यावरुन सध्या खळबळ पाहायला मिळते आहे. जागा वाटपावरुन महायुतीतील तीन पक्षांमध्ये सहमती होताना दिसत नाहीए. यासाठी निवडणूक पूर्व सर्व्हेक्षणाचे दाखलेही दिले जात आहेत. महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एका सर्व्हेचा उल्लेख करत भाजपला थेट इशाराच दिला आहे.

Citizens crowd PMC offices to file objections after large-scale errors and mismatched entries surface in Pune’s draft voter list ahead of the municipal corporation election.
Anna Hazare: आण्णा हजारे पुन्हा उपोषणला बसणार! कशासाठी अन् कधीपासून? वाचा सविस्तर

नेमका विषय काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (AP) शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दावा केला आहे की, भाजपने जो सर्वे केला होता त्यामध्ये भाजपने सांगितलं आहे की, आमच्या 50 जागा धोक्यात आहेत. याचा विचार करून त्यांनी महायुतीतील घटक पक्षांची जागेबाबत विचार करावा. महायुती म्हणून आम्ही एकत्र असल्यानं जर भाजपने आमचा विचार केला नाही केला तर आम्ही स्वबळावर लढू. आंदेकर कुटुंबियांनी आमच्याकडं अद्यापतरी उमेदवारी मागितलेली नाही. शिवसेनेचे अस्तित्व पुण्यात कुठे दिसत नाही. शिवसेनेचा एकच नगरसेवक आहे. त्यामुळे भाजपने मित्र पक्षांचा विचार नाही केला तर आम्ही स्वबळावर लढू असा इशारा सुभाष जगताप यांनी दिला आहे.

Citizens crowd PMC offices to file objections after large-scale errors and mismatched entries surface in Pune’s draft voter list ahead of the municipal corporation election.
Nilesh Rane : "नाहीतर अजून कठीण होईल..."; नितेश राणेंनी मंत्रि‍पदाची शपथ घेताच निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

भानगिरे-धंगेकर दोन गट

दरम्यान, शिवसेना नेते आणि कसब्याचे माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पुण्यात 165 जागांवरती लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये दोन गट पडल्याचं आज या पत्रकार परिषदेमधून पाहायला मिळालं. तर रवींद्र घाटे यांनी आम्ही महायुतीत आहोत मित्र पक्षांबरोबर आम्ही एकत्रित चर्चा करून निवडणूक लढवू असं सांगितलं आहे.

125 जागांवरती भाजपने दावा केला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी शिवसेना आणि भाजप वरती टीका करत आपली भूमिका मांडली असून स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये अलबेला असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. शिवसेनेमध्ये दोन गट पडले असून शिवसेनेचे अस्तित्वच पुण्यात कुठे दिसत नाही असं सुभाष जगताप यांनी सांगत शिवसेनेला डिवचलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com