President Droupadi Murmu Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचं 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थितीत राहणार

Trimbakeshwar Kumbh Mela, Draupadi Murmu : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभाचा मूहुर्त ठरला आहे. येत्या ३१ ऑक्टोबरला नाशिक-त्र्यंबकेश्वर दोन्ही ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे. वेळही ठरली आहे.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela Flag Hoisting on October 31 : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहण करुन होणार आहे. या सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थितीत राहणार असल्याची माहिती कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी बैठक पार पडली. त्यात महाजनांनी या सोहळ्याची सविस्तर रुपरेषा सांगितली.

सिंहस्थाचे पर्व यंदा तब्बल २२ महिन्यांचे असून, ध्वजारोहणाने त्याचा औपचारिक प्रारंभ होणार आहे. येत्या ३१ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी नाशिकच्या रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर एकाचवेळी ध्वजारोहण होणार आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी ध्वजारोहण असल्याने मान्यवरांची दोन्ही ठिकाणी विभागणी केली जाणार आहे. मात्र, राष्ट्रपती मुर्मू नेमक्या कोणत्या ठिकाणी उपस्थित राहणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्यातील वरिष्ठ मंत्री आणि प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ध्वजारोहणासाठी सुरक्षा व्यवस्थेचे परिपूर्ण नियोजन करावे. वाहतूक व्यवस्था, वाहनतळ, गर्दी नियंत्रण,. सुरक्षा, आरोग्य व स्वच्छतेचे काटेकोर नियोजन करावे. नियोजन करताना कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले असून त्यांनी प्रशासनाला त्याबाबत सूचना केल्या.

कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती दिली. रामकुंड, कुशावर्त तसेच नील पर्वत परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रस्तावित आहे. गोदावरी आरती, दिव्य संध्या, रोषणाई, दीपप्रज्वलन, शंखनाद आदी कार्यक्रमांसह संकेतस्थळ व कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून सिंहस्थाची माहिती व्यापक स्तरावर पोहोचविण्यात येणार आहे.

ध्वजारोहण सोहळ्याची रूपरेषा

- नाशिकमध्ये एक लाख भाविकांच्या उपस्थितीचे नियोजन

- त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहणानंतर जाहीर सभा

- नाशिकमध्ये सायंकाळी दीपप्रज्वलन

- नाशिकमध्ये तीनदिवसीय कार्यक्रम

- नाणिजधामच्या भाविकांची नाशिकमध्ये रॅली

- सिंहस्थ ध्वजाच्या मिरवणुकीचे नियोजन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT