Nashik Politics : दादा भुसेंच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकांचा गौरव ; निमंत्रण देऊनही भाजप-राष्ट्रवादीचे प्रमुख नेते का आले नाही?

Dada Bhuse Nashik : शिक्षकांच्या गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमातही राजकीय चर्चेने वरचष्मा घेतल्याचे चित्र दिसून आले. महापौर-आयुक्तांसह प्रमुख लोकप्रतिनिधींच्या गैरहजेरीवर उपमहापौरांनी खंत व्यक्त केली.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik teacher felicitation ceremony : महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळ्यात शिक्षकांचा सन्मान करण्यात आला; मात्र या कार्यक्रमाला महापौर, महापालिका आयुक्तांसह प्रमुख लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. विशेषत: राष्ट्रवादी-भाजपच्या प्रमुख लोकप्रतिनिधींनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने महायुतीत अंतर्गत काही खदखद सुरु आहे का, यावर कार्यक्रमात चर्चा रंगली.

महापालिकेचा अधिकृत कार्यक्रम असूनही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने कार्यक्रमाच्या औपचारिकतेवरच प्रश्न उपस्थित झाले. प्रमुख पाहुण्यांच्या अनुपस्थितीची खंत शिवसेना नेते व उपमहापौर विलास शिंदे यांनी व्यासपीठावरून व्यक्त केली.

शुक्रवारी (ता. १८) सदाशिव भोरे सभागृहात हा सोहळा झाला. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र पालकमंत्री गिरीश महाजन, माजी पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, महापौर हिमगौरी आडके, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार किशोर दराडे, गोकुळ गिते, सीमा हिरे, सत्यजित तांबे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सरोज आहिरे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप तसेच महापालिका आयुक्त मनीषा खत्री यापैकी कुणीही कार्यक्रमाला उपस्थितीत राहिलं नाही.

Dada Bhuse
Dada Bhuse : 'त्या' शिक्षक मृत्यू प्रकरणाला राजकीय रंग.. ; शिक्षणमंत्री दादा भुसेंचे पहिल्यांदाच हिरेंच्या संस्थेविषयी थेट भाष्य

महापालिकेच्या अधिकृत कार्यक्रमाला महापौर आणि आयुक्त यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधी अनुपस्थित असल्याने कार्यक्रमस्थळी त्याची चर्चा सुरू झाली. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेल्या सोहळ्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती का राहिली, असा प्रश्न उपस्थितांकडून उपस्थित करण्यात आला. त्यातच उपमहापौर विलास शिंदे यांनी व्यासपीठावरूनच प्रमुख मान्यवरांच्या अनुपस्थितीची खंत व्यक्त केल्याने या गैरहजेरीची चर्चा आणखी वाढली.

निमंत्रण देऊनही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एकही नेता सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी मात्र कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे हा महापालिकेचा अधिकृत कार्यक्रम असला, तरी प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे त्याला राजकीय रंग चढल्याचे चित्र निर्माण झाले.

Dada Bhuse
Nashik News : निधी वेळेत खर्च करा, नाहीतर विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करणार; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

या अनुपस्थितीमागे स्थानिक राजकीय समीकरणे, महायुतीमधील अंतर्गत मतभेद, समन्वयाचा अभाव किंवा अन्य काही राजकीय कारणे आहेत का, याबाबत उपस्थितांमध्ये तर्कवितर्क रंगले. शिक्षकांच्या सन्मानापेक्षा राजकीय मतभेद मोठे ठरले का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित झाला. परिणामी, शिक्षकांच्या सत्काराच्या कार्यक्रमातही राजकीय चर्चेने काही काळ वरचष्मा घेतल्याचे चित्र दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com