Nashik BJP News: कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात साधू ग्राम वसविन्यात येणार आहे. त्यासाठी सतराशे झाडे तोडण्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. या वृक्षतोडीवरून नाशिक शहरात आंदोलन सुरू झाले आहे.
महापालिकेने साधू ग्राम येथील सतराशे झाडे तोडण्याचे जाहीर केले आहे. महापालिकेच्या या प्रक्रियेला नाशिक शहरातील जागरूक नागरिक आणि पर्यावरण वाद्यांनी तीव्र विरोध केला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या सुनावणीत शेकडो कार्यकर्त्यांनी हरकती नोंदवल्या.
नागरिकांनी विरोध केला. त्याबाबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनीही त्या विरोधात भूमिका घेतली.
अभिनेते सयाजी शिंदे यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते तपोवन येथे जाऊन निषेध करीत आहेत. नागरिकांनी या विषयावर रोज आंदोलन सुरू केले आहे. याविषयी नाशिककरांच्या भावना अतिशय तीव्र असून वृक्षतोडीला विरोध केला आहे.
याबाबत वातावरण तापले असताना शहरातील सत्ताधारी भाजपचे तिन्ही आमदार मात्र मौन आहेत. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदारांनी ही यावर बोलणे टाळले आहे. लोकप्रतिनिधींना वृक्षतोडीचा विषय फारसा महत्त्वाचा वाटला नाही की काय? अशी विचारणा होऊ लागली आहे.
शहरातील अनेक गंभीर समस्या आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे नागरिकांचा संताप होत आहे. यावर देखील सत्ताधारी आमदारांचे एकमत होत नव्हते. गेल्या आठवड्यात तिन्ही आमदारांनी महापालिका आयुक्तांना या प्रश्नावर कारवाईची विनंती केली. मात्र वृक्षतोडीचा प्रश्न येताच तिन्ही आमदार तिन्ही दिशेला तोंड करून निघून गेले.
दहा वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी असलेली झाडे तोडल्याने पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होणार आहे. संदर्भात सुवर्णमध्य काढण्यात यावा. वृक्षतोडीला पर्याय सुचवावा, अशी मागणी सातत्याने होत आहे.
यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यापासून तर शंकराचार्य स्वामी सरस्वती आणि शहरातील महंत सोमेश्वरानंद या साधून सह विविध धार्मिक नेत्यांनीही वृक्षतोडीला विरोध केला आहे.
वृक्षतोडी विरोधात मोठे आंदोलन झाल्याने माध्यमातून आहे आणि विशेषतः समाज माध्यमांवर हा विषय गाजत आहे. या जनआंदोलनात हजारो नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. सत्ताधारी पक्ष आणि आमदार मात्र यापासून दोन हात लांब आहेत. त्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.