Ajit Pawar Politics: दादा भाजपला घाबरले का?, आधी पालकमंत्रीपदाचा शब्द दिला, जाता जाता म्हणाले, सिरीयसली घेऊ नका!

Ajit Pawar on guardian minister post promise: नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या राजकीय वादाची राजकीय जखम भरून निघाली नाहीच!
Analysis of Ajit Pawar’s shifting political statements
Analysis of Ajit Pawar’s shifting political statementsSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News: नाशिकच्या पालकमंत्री पदाची चर्चा झाली नाही, असा दिवस जात नाही. गेले काही दिवस मात्र हा विषय मागे पडला होता. आता त्याची पुन्हा चर्चा झाली. त्याला कारण देखील तसेच घडले आहे.

नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात रस्सीखेच सुरू आहे. या राजकीय वादातून हा निर्णय रखडला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची झालेली नियुक्ती त्यामुळेच थंड बस्त्यात गेली.

उपमुख्यमंत्री अजित पवार नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या दौऱ्यावर होते. यावेळी भगूर येथे झालेल्या सभेत हा विषय काढला. मात्र आपल्या स्वभावाच्या विपरीत फिरकी घेण्यासही ते विसरले नाही.

Analysis of Ajit Pawar’s shifting political statements
Aditya Thackeray Politics: वृक्षतोडीच्या वादात आदित्य ठाकरेंची उडी, सत्ता काळातील ‘ ‘त्या’ निर्णयाची करून दिली आठवण!

नाशिकचा पालकमंत्री कोण? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावर अजित पवार यांनी पालकमंत्री नसेल तर मलाच पालकमंत्री समजा, असे विधान केले.

Analysis of Ajit Pawar’s shifting political statements
Ajit Pawar Politics: बापरे!, अजित दादा हे काय बोलले?, स्वतःच्याच आमदारांची झोप उडवली!

उपमुख्यमंत्री पवार यांच्या या विधानाने सभेतील उपस्थित त्यांनीही टाळ्या वाजवल्या. कार्यकर्ते आणि समर्थकांमध्येही उत्साह संचारला. मात्र नंतर लगेचच पवार यांनी फिरकी घेत "हा विषय सिरियसली घेऊ नका" असे सांगत त्यातील आवाज काढून घेतली.

पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे पक्षाचे शिक्षण मंत्री दादा भुसे आग्रही आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही याबाबत आपली इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. भाजपने मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली होती.

महायुतीतील तिन्ही घटक पक्ष नाशिकचे पालकमंत्री पद आपल्याकडेच हवे यासाठी हट्ट धरून बसले आहेत. त्यामुळे हा राजकीय वाद मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. या तिघांनाही गेली वर्षभर त्याबाबत निर्णय घेता आलेला नाही. त्यानिमित्ताने नाशिककरांच्या पालकमंत्री पदाच्या जखमेवरील खपली पुन्हा एकदा निघाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com