Nashik MLC Election | Gokul Gite | Narendra Darade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC : मतदान केंद्र ओस; महायुतीच्या नगरसेवकांसाठी दराडे तिष्ठत बसले! अखेर गीतेच म्हणाले, 'मला मतदान करू नका...'

Nashik Legislative Council Election : सकाळी भाजप नेते आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी गणेश गीते यांना फोन केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गणेश गीते यांना फोन करून प्रचार सुरू असल्याची तक्रार आल्याची सांगितली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

Sampat Devgire

Nashik News, 18 Jun : नाशिक विधानपरिषद निवडणुकीचे मतदान आज चर्चेचा विषय ठरले. जिल्हाधिकारी कार्यालयात साडेअकरा पर्यंत एकही मतदार फिरकला नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराची चांगलीच घालमेल झाली. सकाळी साडेतीन तास जिल्हाधिकारी कार्यालय या केंद्रावर एकही मतदार फिरकला नाही. त्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली होती.

महायुतीचे उमेदवार आमदार नरेंद्र दराडे आणि त्यांचे समर्थक मतदारांच्या प्रतीक्षेत तिष्ठत बसलेले दिसले. अखेर भाजपचे गणेश गीते हे आपले बंधू आणि बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांच्या समवेत पोहोचले. यावेळी त्यांनी आम्ही कोणताही प्रचार केलेला नाही. काही मतदारांशी संपर्क केलेला नाही, असे स्पष्टीकरण दिले.

सकाळी भाजप नेते आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी गणेश गीते यांना फोन केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गणेश गीते यांना फोन करून प्रचार सुरू असल्याची तक्रार आल्याची सांगितली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. गणेश गीते यांनी कोणताही प्रचार सुरू नसल्याचे स्पष्टीकरण या दोन्ही नेत्यांना दिले.

त्यानंतर गणेश गीते यांनी मतदान केंद्रावर येऊन कृपया आम्हाला मतदान करू नये. कोणत्याही मतदाराशी संपर्क केलेला नाही. इगतपुरी येथील एका समर्थकाने सोशल मीडियावर तीन नावे असलेली मतपत्रिका टाकली होती. त्याने दोन दिवसांपूर्वी माझ्याशी संपर्क करून त्याबाबत माहिती दिली होती. काल रात्रीही 200 हून अधिक समर्थकांनी आपल्याशी संपर्क करून मतदान करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आग्रह केला होता.

या सगळ्यांना आपण असे काहीही करू नये असे स्पष्ट सांगितले होते. मंत्र्यांसह चार नेत्यांना आपण शब्द दिला आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत हा शब्द पाळणार असल्याचे गीते यांनी सांगितले. महायुतीचे सर्वच मतदार ठाणे येथे सहलीला गेले होते. यातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मतदार स्वतंत्रपणे नाशिकला आले. भाजपचे मतदारही स्वतंत्रपणे नाशिकला आले.

मात्र एक वाजेपर्यंत हे सर्वजण नाशिक शहरात पोहोचले नव्हते. भाजपचे दिनकर पाटील यांनी सव्वा बाराला पहिले मतदान केले. त्यानंतर त्यांच्या प्रभागातील सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानामध्ये सकाळी अतिशय निरुत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT