नाशिक : साहित्य संमेलनांमध्ये राजकारणाचा शिरकाव किंवा हस्तक्षेप नसावा, असा सर्वसाधारण सूर साहित्यिकांमध्ये असला, तरी नाशिकमध्ये होत असलेले संमेलन राजकारण व राजकीय व्यक्तींभोवतीच केंद्रित झाल्याचे बघायला मिळत आहे. संमेलनानिमित्त शनिवारी नाशिक दौऱ्यावर येणार असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) संमेलनाला उपस्थित राहणार की नाही याभोवतीच चर्चा रंगली आहे.
संमेलनासाठी पाहुण्यांना निमंत्रित करताना भाजप नेत्यांना डावलल्याने नाराजीचे नाट्य सुरू झाले होते. त्यानंतर स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी महापौर सतीश कुलकर्णी व श्री. फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून, संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यानुसार दोघांनीही विनंती मान्य केल्याचा दावा भुजबळ यांच्याकडून करण्यात आला असला, तरी भाजपकडून त्यास दुजोरा मिळालेला नाही.
एकीकडे साहित्य कुंभमेळ्याचे अमृत वाहत असताना दुसरीकडे भाजपने निवडणुकीचे निमित्त साधून उत्तर महाराष्ट्रातील १३ नगरपंचायतींचा तयारी आढावा घेण्यासाठी बैठक बोलविली आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष पाटील व विरोधी पक्षनेते फडणवीस नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील १३ नगरपंचायतींची निवडणूक येत्या २१ डिसेंबरला होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी दोनपासून पंचवटीतील स्वामिनारायण बॅन्क्वेट हॉलमध्ये तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला जाणार आहे. श्रीकांत भारतीय, सुजित कर्जतकर या वेळी उपस्थित राहतील. बैठकीनंतर फडणवीस व पाटील सातपूरचे दिवंगत मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या निवासस्थानी भेट देतील असा साधारण कार्यक्रम आहे. त्यामुळे भाजपचे दोघेही वरिष्ठ नेते नाशिकमध्ये असतानाही संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.