Karan Gaikar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik constituency 2024: 'वंचित'च्या करण गायकरांनी भरला दोनदा अर्ज; काय आहे कारण?

Sampat Devgire

Vanchit Bahujan Aghadi: नाशिक मतदारसंघातून (Nashik Constituency) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अनेक उमेदवारांनी गर्दी केली होती. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनीही रॅली काढून आपले शक्ती प्रदर्शन केले. नाशिक मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून करण गायकर (Karan Gaikar) यांनी आज आपल्या आघाडीच्या नेत्यांसह रॅली काढली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळी शहरातून ही रॅली काढण्यात आली. त्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय जवळ झाला.

वंचित (VBA) आघाडीचे गायकर यांनी आज रॅली काढली, मात्र त्यावेळी त्यांनी अर्ज दाखल केला नाही. रॅलीनंतर पुन्हा येत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, गायकर यांनी कालही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आपले शक्ती प्रदर्शन आणि मतदारांना संदेश देण्यासाठी आजची रॅली काढल्याची चर्चा होती. नाशिक (Nashik) मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. शहरात चार औद्योगिक वसाहती आहेत. मात्र तरी स्थानिक युवकांना रोजगार मिळत नाही. या प्रश्नांवर आजवरच्या कोणत्याच खासदाराने काहीही काम केलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) हवे आहे. त्यासाठी विविध लढे झाले. गेले काही वर्ष आपण सातत्याने या लढ्यामध्ये सहभाग दिला आहे अशा विविध प्रश्नांसाठी आपली उमेदवारी आहे. सबंध मतदारसंघातून बेरोजगार युवक, नागरिक, महिला, शेतकरी या सगळ्यांनी आपल्याला मोठा प्रतिसाद दिला आहे, असा दावा त्यांनी केला.

नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्यात मुख्य लढत आहे. शांतिगिरी महाराज हे अपक्ष उमेदवारी करीत आहेत. त्यांचे अनुयायी सबंध मतदार संघात विखुरलेले आहेत. गायकर यांचं अन्य काही उमेदवार मैदानात आहेत. आता प्रचाराला अवघे पंधरा दिवस शिल्लक असल्याने प्रचाराची दिशा काय ठरते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT