Shinde Will Join BJP? : सुशीलकुमार शिंदे भाजपत जाणार?; नाना पटोलेंनी दिले हे उत्तर...

Nana Patole Solapur Tour : मोदी किती खोटारडे आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही. ते केव्हा रडतील, केव्हा हसतील. इथे नोटबंदी करून जपानमध्ये जाऊन टाळ्या वाजवत मी देश कसा बरबाद केलं, हे ते सांगत होते. लोक रांगेत थांबून मरत होते आणि हे जपानमध्ये जाऊन हसत होते.
Nana Patole- Sushilkumar Shinde-Prakash Ambedkar
Nana Patole- Sushilkumar Shinde-Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 3 May : आमदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे हे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये जातील, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली असून आंबेडकर यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही, असे सांगत शिंदेंच्या भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली.

काँग्रेस आणि वंचितच्या युती हा आता चर्चेचा विषय नाही. सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. मुंबईतून वर्षा गायकवाड यांचे तिकीट जाहीर केल्यावर त्यांनी दुसऱ्याच दिवशी वंचितचे तिकीट जाहीर केले. संविधान वाचवणे आणि भारतीय जनता पक्षाला (BJP) सत्तेतून बाहेर काढणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) काय बोलतात, याकडे लक्ष देण्याची आम्हाला गरज नाही, असेही नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole- Sushilkumar Shinde-Prakash Ambedkar
Vitthal Sugar Factory : अभिजित पाटलांना दिलासा; ‘विठ्ठल’वरील कारवाई मागे, पाच तारखेपर्यंत गोदामे ताब्यात मिळणार

काँग्रेसचा भाजपसोबत छुपा समझोता, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे, त्यावर नाना पटोले म्हणाले, कोणाचं विश्लेषण करायचे आणि त्यांना सर्टिफिकेट देण्याचे अधिकार आंबेडकर यांना कोणी दिलेले नाहीत. त्यामुळे आंबेडकर यांच्या विषयावर चर्चा करण्याचा मुद्दाच नाही. माझा भाजपसोबत संबंध आहे, असे ते म्हणत असतील तर त्यांनी काय बोलावं, हा त्यांचा संबंध आहे. त्यांना आम्ही भाजपचे बी टीम म्हणावं का. भाजपला सत्तेच्या बाहेर हकलणे, हे सर्वांत महत्वाचे आहे.

मोदी किती खोटारडे आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही. ते केव्हा रडतील, केव्हा हसतील. इथे नोटबंदी करून जपानमध्ये जाऊन टाळ्या वाजवत मी देश कसा बरबाद केलं, हे ते सांगत होते. लोक रांगेत थांबून मरत होते आणि हे जपानमध्ये जाऊन हसत होते. दहा वर्षांत तुम्ही काय केले, तर त्यांनी देश विकला, देशाला खड्ड्यात घातले, ही गोष्ट महत्वाची आहे. मोदींसारखा नटसम्राट या देशात आणि जगात नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

Nana Patole- Sushilkumar Shinde-Prakash Ambedkar
Ambedkar on Shinde : लोकसभा निवडणुकीनंतर प्रणितींसह सुशीलकुमार शिंदे भाजपत जाणार; आंबेडकरांचा गौप्यस्फोट

पटोले म्हणाले, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा न घेता 2019 मध्ये 24 लोकांना जॉईंट सेक्रेटरी पोस्टवर बसवता. सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश मीडियासमोर येऊन सांगतात की आम्हाला वाचवा, ही कशाची लक्षणे आहेत. लोकांसमोर 2014 आणि 2019 मधील अनुभव आहेत, त्यामुळे संविधान बदलणार नाही, असे ते आता सांगत असतील तर ते संविधान बदलणार असा त्याचा अर्थ होतो.

Edited By : Vijay Dudhale

Nana Patole- Sushilkumar Shinde-Prakash Ambedkar
Sule Vs Pawar : धमक्या देणाऱ्यांना सांगा, विधानसभा फार लांब नाही; सुप्रिया सुळेंनी अजितदादांना ललकारले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com