Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : समता परिषदेची 'ही' मागणी छगन भुजबळ पूर्ण करणार का ?

Samta Parishad demands Bhujbal to rethink on Nashik candidature : महात्मा फुले समता परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी पुन्हा उमेदवारी घेण्याबाबत समर्थकांशी झाली चर्चा..

Sampat Devgire

Nashik lok sabha constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांची उमेदवारी अपेक्षित होती. जागावाटपाच्या वादातून भुजबळ यांनी त्यातून माघार घेतली आहे. मात्र, भुजबळ यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी आज केली.

छगन भुजबळ यांच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा वाद अद्याप संपलेला नाही. भुजबळ यांनी महायुतीतील राजकीय विसंवाद आणि उमेदवारीच्या निर्णयाला होणारा विलंब याच्या निषेधार्थ गेल्या आठवड्यात आपण उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांच्या समर्थकांत या निर्णयाच्या विविध प्रतिक्रिया उमटल्या. मंगळवारी या संदर्भात मंत्री भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानी समता परिषदेची बैठक झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समता परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी करण्याचा आग्रह धरला. या मागणीला विदर्भ ब्राह्मण संघ तसेच अन्य ओबीसी संघटनांनीही पाठिंबा दिला. ओबीसी (OBC) चेहरा म्हणून भुजबळ राज्यभर परिचित आहेत. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भुजबळ यांचे नाव लोकसभा निवडणुकीसाठी सुचविले होते. एकंदर परिस्थितीचा विचार करता ओबीसींचे प्रश्न मांडण्यासाठी एक प्रतिनिधी संसदेत असायला हवा. ओबीसींचे अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. याचा विचार करून भुजबळ यांनी उमेदवारीचा फेरविचार करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लोकसभेत उमेदवारी केल्यास समता परिषदेसाठी ती घोषणा व बाब ठरेल. केंद्रीय नेतृत्वाने भुजबळ यांची दखल घेतली आहे. नाशिकच्या विकासासाठी आणि ओबीसी बांधवांच्या हक्कांसाठी भुजबळ यांची दिल्लीत आवश्यकता आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांचे नेतृत्व असेल.नाशिक मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळावी ती उमेदवारी मिळाल्यास परिसराच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.

त्यामुळे भुजबळ आपल्या निर्णयाचा फेर विचार करतील का? असा प्रश्न निर्माण झाला. मात्र या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी आपण यापूर्वीच उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडलो आहोत. आता उमेदवारी करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. महायुती जो उमेदवार देईल त्याच्या प्रचारासाठी आम्ही सर्व काम करू. मी माझ्या निवडणूक न लढविण्याच्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांनी मार्गदर्शन केले. बाळासाहेब कर्डक हे अध्यक्षस्थानी होते. समाधान जेजुरकर, जिल्हा अध्यक्ष डॉ योगेश गोसावी, प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे, शहराध्यक्ष कविताताई कर्डक, पूजा आहेर, अशा भांदुरे, अंबादास खैरे, योगेश मिसाळ, संतोष खैरनार, दिलीप तुपे, गजू घोडके, ज्ञानेश्वर महाजन, नाना पवार यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

(Edited by : Chaitanya Machale)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT