Nilesh Lanke News : मी पैलवान, मै किसके भी साथ खेलुंगा; नीलेश लंकेचे खासदार विखेंना आव्हान

Nagar Election News : माजी आमदार नीलेश लंके यांनी मंगळवारी हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला.
Sujay Vikhe, Nilesh Lanke
Sujay Vikhe, Nilesh LankeSarkarnama

Nagar Election News : भाजप महायुतीचे विद्यमान खासदार सुजय विखे यांचे तगडे आव्हान समोर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांनी कोणताही गाजावाजा न करता, कोणतेही शक्तfप्रदर्शन न करता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी साधेपणाने अर्ज भरला.

नीलेश लंके (Nilesh lanke) यांनी अर्ज भरत असताना कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयबाहेर गर्दी केली होती. हनुमान जयंतीचे निमित्त साधत कार्यकर्त्यांनी त्यांना पितळी आणि चांदीची गदा भेट दिली. या गदा हातात घेतात, "मी हनुमानरायांचा भक्त आहे. गदा कोणालाही मिळत नसते. मी पैलवानच आहे. मै किसके भी साथ खेलुंगा", असे आव्हान नीलेश लंके यांनी विरोधकांना दिले.

माजी आमदार नीलेश लंके यांनी हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. कोणतेही शक्तfप्रदर्शन न करता हा अर्ज अतिशय साधेपणाने भरणार असल्याची माहिती नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली. त्यानुसार नीलेश लंके त्यांच्या घरातून हंगा (ता. पारनेर) येथील घरातून सकाळी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. घरातून निघण्यापूर्वी त्यांना त्यांच्या सौभाग्यवती राणी लंके यांनी औक्षण केले. या वेळी नीलेश लंके यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. (Nilesh Lanke News)

Sujay Vikhe, Nilesh Lanke
Lok Sabha Election 2024 : आरोप-प्रत्यारोप दोन शिंद्यांमध्ये, मात्र नस दाबली जातेय भाजपची

नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादा कळमकर, ज्येष्ठ नेते प्रताप ढाकणे (Prataprao Dhakne), माजी महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे आधी उपस्थित होते.

नीलेश लंके म्हणाले, "नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. जनशक्ती आणि त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर हा उमेदवारी अर्ज भरला आहे. कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी दिलेली या दोन्ही गदा हनुमान भक्त म्हणून स्वीकारतो. मी पैलवान आहे कोणाशीही लढू शकतो. ही लढाई धनशक्तीविरद्ध जनशक्ती अशी आहे". खूप उष्णता आहे. हत्तीवर उन्हामध्ये लोकांना बोलून, त्यांची रोजंदारी बुडवणे योग्य वाटले नाही.

हनुमान जयंती असल्यामुळे जिल्हाभर विविध धार्मिक कार्यक्रम आहेl. लोकांना बोलवून त्यांना वेटीस धरणे मला योग्य वाटले नाही. समाजाला अडचण होईल असं मी काही करणार नाही. त्यामुळे शांततेत येऊन अर्ज भरला तरीदेखील कार्यकर्त्यांनी येथे गर्दी केली. शक्तिप्रदर्शन करायचे असते, तर मला लोक विकत आणण्याची गरज पडत नाही. भाडंदेखील देण्याची गरज पडत नाही. नुसते आवाहन केले असते, तरी हजारो लोक येथे जमा झाले असते. तरीदेखील हजारो लोक येथे उपस्थित आहेत यही हमारी ताकद है, असे नीलेश लंके यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्या चारित्र्याचे अस्त्र बाहेर काढून बदनामी करतील

नीलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका, असा निरोप उद्योजकामार्फत मंत्री विखेंनी पाठवला होता, असा गौप्यस्फाेट शरद पवार यांनी केला होता. यावर नीलेश लंके म्हणाले, "ही निवडणूक पहिल्यापासून धनशक्तीविरुद्ध जनशक्ती, अशी आहे. या निवडणुकीत बळाचा, आर्थिक सत्तेचा गैरवापर होणार आहे. निवडणुकीच्या सुरुवातीला माझ्यावर गुंड असल्याचा आरोप केला. त्यानंतर इंग्रजी भाषेचा मुद्दा काढून आरोप केले. उद्या चारित्र्याचे अस्त्र बाहेर काढून बदनामी केली जाईल". ही लोकसभा निवडणूक लढण्याची पद्धत नाही, असा टोला नीलेश लंके यांनी लगावला.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Sujay Vikhe, Nilesh Lanke
Nilesh Lanke News: नीलेश लंकेंनी घेतली मध्यरात्री बाळासाहेब थोरातांची भेट; दीड तास खलबतं...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com