Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : हेमंत गोडसेंकडून लोकसभेचा प्रचार सुरू; पण भाजप अन् राष्ट्रवादीकडून गोंधळाचा प्रयत्न

Nashik Loksabha Election 2024 : नाशिक मतदारसंघ सामान्यतः महायुतीचा दुसरा प्रमुख घटक असलेल्या शिवसेनेच्या ( शिंदे गट ) वाट्याला जाणार असे अंदाज आहेत. पण...

Sampat Devgire

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. अशातच नाशिक लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस राजकीय अनिश्चितता वाढत आहे. महायुतीतील सर्वच इच्छुकांना खासदारकीची स्वप्नं पडत आहेत. पण, विद्यमान खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) यांनी थेट लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं प्रचार सुरू केला आहे. Lok Sabha Election 2024

महायुतीतील पक्षांनी नाशिक मतदारसंघावर वेगवेगळ्या प्रकारे दावा केला आहे, पण कोणी काहीही दावा केला, कितीही मिसळ पार्टी केली तरी महायुतीमध्ये शिंदे गटाला काही वचन देण्यात आली आहेत. त्यामुळे आम्ही निश्चिंत असून, मतदारसंघ आमचाच असेल, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाला दिलेलं वचन काय आहे? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघ सामान्यतः महायुतीचा दुसरा प्रमुख घटक असलेल्या शिवसेनेच्या ( शिंदे गट ) वाट्याला जाणार, असे अंदाज आहेत. मात्र, महायुतीतील अन्य घटक पक्ष सातत्याने विविध विधाने आणि उपक्रम करून यामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणूक जशी जवळ येऊ लागली तसे हे प्रकार आणखी जास्त वाढल्याने मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवृत्ती अरिंगळे यांनी मिसळ पार्टी केली. भाजपचे नितीन ठाकरे यांनी समर्थकांचा मेळावा घेतला. दिनकर पाटील वेगळे प्रयत्न करत आहेत. या गोंधळामध्ये ही जागा महायुतीतील कोणत्या पक्षाला हा गोंधळ कमी होण्याऐवजी वाढतच आहे. यावर विद्यमान खासदार गोडसे यांनी सर्वच इच्छुकांवर मात करत थेट जनसंपर्क आणि संघटनात्मक विस्तारावर भर देत आपणच उमेदवार, असे स्पष्ट संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेनेच्या (शिंदे गट) गेल्या दोन महिन्यांत नाशिक मतदारसंघातील ग्रामीण भागात 375 आणि नाशिक शहरात 120 शाखा उघडण्यात आल्या आहेत. अनेक नवे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. रोज विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होत आहे. याद्वारे खासदार गोडसे यांनी मतदारांमध्ये थेट उमेदवार म्हणून स्वतःला लाँच केले आहे. पक्षाची संबंध यंत्रणा सक्रिय असल्याने महायुती निवडणुकीच्या दृष्टीने कार्यरत झाल्याचे चित्र आहे.

याबाबत खासदार गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "जागा कोणाला? उमेदवार कोण? हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठरवतील. मात्र, कुठल्याही परिस्थितीत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नाशिक मतदासंघात आम्ही थेट मतदारांपर्यंत गेलो आहोत. हा आमचा निवडणुकीचा प्रचारच आहे. इतर इच्छुकांनी प्रयत्न करणे त्यांचा अधिकार आहे; पण मुख्यमंत्री शिंदे अतिशय प्रभावी आणि दमदार नेते आहेत. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्या आदेशानुसारच नाशिक मतदारसंघात आमचे काम आम्ही सुरू केले आहे."

( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT