Loksabha Election 2024 : शिर्डीत रंगणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना, उद्धव ठाकरेंनी ठोकला शड्डू तर...

Shirdi Loksabha Election 2024 : शिर्डीत शिंदे गटातील खासदार सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
uddhav Thackeray Eknath Shinde Shirdi loksabha constituency
uddhav Thackeray Eknath Shinde Shirdi loksabha constituency Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीच्या ( Loksabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते पायाला भिंगरी लावून राज्याचा दौरा करत आहेत. अशातच शिर्डीत 12 आणि 13 फेब्रुवारीला शिवसेनाविरुद्ध शिवसेना, असा सामना रंगणार आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde ) यांचे एकापाठोपाठ संवाद दौरे होत असल्याने शिर्डीतील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

uddhav Thackeray Eknath Shinde Shirdi loksabha constituency
NCP Sharadchandra Pawar : पक्ष गेला, चिन्हही गेलं, तरी 'हम साथ साथ हैं'

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे मंगळवारी (13 फेब्रुवारी ) दौऱ्यावर येत आहेत. सोनई येथे त्यांची संवाद सभा होणार आहे. माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं नियोजन केलं आहे, तर ठाकरेंच्या 'संवाद सभे'पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संगमनेर येथे सोमवारी (12 फेब्रुवारी ) 'शिवसंवाद' दौऱ्यावर येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना ठाकरे गटाकडून संभाव्य उमेदवार असल्याचं सांगितलं जात आहे. 2014 आणि 2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीकडून सदाशिव लोखंडे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. तसे पाहिल्यास भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला शिर्डीत पहिला विजय मिळवून दिला आहे.

uddhav Thackeray Eknath Shinde Shirdi loksabha constituency
Balasheb Thorat : बाळासाहेब शोधताहेत 'पूर्वी'च्या राज ठाकरेंना!

आता शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिर्डीची जागा पुन्हा जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शड्डू ठोकला आहे. यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना, असा सामना रंगणार असे चित्र आहे.

uddhav Thackeray Eknath Shinde Shirdi loksabha constituency
Shivsena Eknath Shinde : शिंदे गट चंद्रपुरात वाढवतोय ताकद, गळाला लावला काँग्रेसचा ‘हा’ युवा नेता !

शिवसेना फुटीनंतर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीत कोणाच्या बाजूनं कौल मिळतो, याची उत्सुकता लागली आहे. उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूतीची लाट आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीत ठाकरे आणि शिंदे एकमेकांना भिडणार आहेत. एकनाथ शिंदेंनी शिर्डी लोकसभेची जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. ठाकरे आणि शिंदेंच्या दौऱ्यामुळे शिर्डीतील राजकीय वातावरण ढवळून निघणार, हे नक्की आहे.

uddhav Thackeray Eknath Shinde Shirdi loksabha constituency
Bharat Gogavale: रायगडकडे जाणाऱ्या पायऱ्या तरी ठाकरेंना माहिती आहेत का ?

2014 आणि 2019 मध्ये मोदी लाटेत शिवसेनेनं शिर्डीची जागा जिंकली आहे. 2019 मध्ये ऐनवेळी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी खासदार सदाशिव लोखंडेंच्या मागे यंत्रणा उभी केली. यामुळे सदाशिव लोखंडेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. विशेष म्हणजे, शिर्डी लोकसभेअंतर्गत येत असलेल्या विधानसभा मतदारसंघात एकही शिवसेनेचा आमदार नाही. तरीही, शिर्डी लोकसभेची जागा गेली तीन टर्म शिवसेनेकडे आहे.

R

uddhav Thackeray Eknath Shinde Shirdi loksabha constituency
BJP Vs Shiv Sena: ‘वावरा’तून भाजपला शिवसेना दाखवणार ‘पावर’!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com