Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Vs Bjp : नाशिक पाहिजे तर जळगाव द्या, शिंदे गटाचा भाजपला प्रस्ताव !

controversy between the BJP and the Shinde group : नाशिक येथील जागेबाबत भाजप व शिंदे गटात वाद

कैलास शिंदे

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्यापही महायुतीत जागावाटप ठरलेले नाही. त्यापूर्वीच आता वाद सुरू झाले आहेत. नाशिक येथील शिवसेना शिंदे गटाकडे असलेली जागा भाजपने मागितली आहे. मात्र, शिंदे गटाने यासाठी नकार दिला आहे. सत्तेत मित्र पक्ष असलेल्या भाजपने यासाठी आग्रह केलाच तर या जागेच्या बदल्यात भाजपकडे असलेली जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा घेण्याची तयारी आता शिंदे गटाकडून केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी महायुतीच्या माध्यमातून निवडूक लढणार आहे. मात्र, अद्यापही या तीनही पक्षांतर्फे जागावाटपाचा फार्म्युला अद्यापही ठरलेला नाही, तर दुसरीकडे काही जागांवरून आता महायुतीत अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. नाशिक येथील जागेबाबत भाजप व शिंदे गटात हे वाद सुरू झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिक येथे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आहेत. ते दोन वेळा शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरून तिसऱ्यांदा विजय मिळवित हॅटट्रिक करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. शिंदे गटातर्फे त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्‍चित आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिककडे भाजपचे विशेष लक्ष आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा नाशिकचे दौरे केले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील नुकतीच नाशिक येथे काळाराम मंदिरात श्रीरामाची पूजाही केली आहे. त्यामुळे भाजपने नाशिक लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सध्या शिंदे गटाकडे असलेली ही जागा भाजपने मागितल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली आहे.

दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पक्षीय मेळाव्यात याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. सलग दोन वेळा पक्षाकडून विजयी झालेले खासदार हेमंत गोडसे यांचा हा मतदारसंघ सोडण्यास शिवसेना शिंदे गटाने भाजपला स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, भाजपने या जागेवर आपला दावा कायम केला आहे. शेवटचा डाव म्हणून खासदार हेमंत गोडसे यांच्यावर असलेले आरोपही भाजपने पुढे केल्याचे सांगण्यात येत आहे.

...तर जळगावची जागा द्या

नाशिक येथील जागा भाजप घेत असेल, तर त्या बदल्यात जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा आम्हाला द्यावी, असा प्रस्ताव शिंदे गटाकडून देण्यात आला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडे आहे. या ठिकाणी भाजपचाच खासदार निवडून येत आहे. या मतदारसंघात उन्मेश पाटील हे भाजपचे खासदार आहेत. भाजपने ही जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, आता शिवसेना शिंदे गटाने या जागेची भाजपकडे नाशिकच्या बदल्यात मागणी केल्याचे बोलले जात आहे. शिवसेना शिंदे गटाने या जागेची मागणी करताना या मतदारसंघात सहा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांत असलेले पक्षाचे बळ दाखविले असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता दोन्ही जागांबाबत महायुतीच्या बैठकीत काय निर्णय होणार, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Chaitanya Machale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT