Loksabha Election 2024 : महायुतीमध्ये बारामतीची जागा अजित पवार गटच लढवणार

Political News : भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एकत्रित बैठक घेऊन काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati Loksabha News : बारामती लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात वाद रंगला आहे. त्यातच आता आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच लढवणार असल्याचे जवळपास फायनल झाले आहे.

भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एकत्रित बैठक घेऊन काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

Ajit Pawar
Mamata Banerjee News : ममतांच्या दोन खासदारांचे बंड; लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बसणार धक्का...

येत्या काळात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महायुती म्हणून बैठक घ्या. भाजप (Bjp), शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एकत्रित बैठक घेऊन काम करा. त्यासोबतच येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी बूथ यंत्रणा, मतदार याद्यावर काम करा, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांची रविवारी इंदापूरमध्ये सभा

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांनी जो आमचे विधानसभेला काम करेल, आम्ही त्यांचे लोकसभेला काम करणार, असे म्हटले होते. मात्र, इंदापुरात अजित पवार गटाचा आमदार आहे. त्यामुळे रविवारी इंदापूरमध्ये अजित पवारांची जाहीर सभा होणार आहे. या मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

R

Ajit Pawar
Ajit Pawar : ...तसं तुम्ही करु नका; अजितदादांनी कार्यकर्त्यांना केले सावध...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com