Rajabhau vaje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik constituency 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजेंना श्रीमंतीचा कौटुंबिक वारसा !

Shivsena vaje politics, Rajabhau vaje is a family heirloom Rich person : माजी आमदार वाजे यांच्याकडे 13 कोटींची जामीन, पेट्रोल पंप आणि 5 वाहने

Sampat Devgire

Rajabhau vaje news : शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबत त्यांनी आपल्या कौटुंबिक संपत्तीचे विवरण पत्र दाखल केले आहे.

माजी आमदार वाजे यांच्या विरोधात कोणताही खटला प्रलंबित नाही. त्यांच्या विरोधात कोणताही पोलिसांत गुन्हेगारी खटला दाखल झालेला नाही. करपात्र उत्पन्न नसल्याने त्यांची पत्नी आयकर विवरणपत्र दाखल करीत नाहीत. त्यांच्याकडे आठ ग्रॅम तर पत्नी दीप्ती वाजे यांच्याकडे 225 ग्रॅम असे 233 ग्रॅम सोने आहे. वाजे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात 76 लाखांवरून 1.52 कोटी अशी दुप्पट वाढ झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वाजे हे शेतकरी (FARMER) आहेत. त्यांना वारसा हक्काने सिन्नर तसेच डुबेरे येथे शेत जमीन मिळालेली आहे. याशिवाय सिन्नर शहर डुबेरे सरदवाडी येथे त्यांच्या शेतजमिनी आणि निवासी भूखंड आहेत. त्याचे मूल्य 13.27 कोटी आहे. याशिवाय त्यांनी 35 लाख रुपयांची जमीन खरेदी केलेली आहे. त्यांच्याकडे सिन्नर शहरात पेट्रोल पंप असून त्याचे मूल्य 78.70 कोटी रुपये आहे. जनहित फार्मर्स प्रोडूसर कंपनी मध्ये त्यांचा सहभाग असून त्यात 17.95 लाखांचे कर्ज आहे.

माजी आमदार वाजे यांच्याकडे 70 हजार रुपये रोख आहेत. त्यांच्याकडे आयुर्विमा महामंडळाच्या दोन पॉलिसी असून त्याचे मूल्य 2.90 लाख रुपये आहे. विविध बँकांमध्ये त्यांच्या 13.79 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. वाजे यांच्याकडे एक बुलेट आणि अॅक्टिव्हा अशा दोन दुचाकी आहेत. याशिवाय ट्रॅक्टर, महिंद्रा जीप, होंडा सिटी कार आणि इनोव्हा कार आहेत. त्यांनी स्टेट बँक (BANK) आणि डुबेरे येथील पतसंस्थेकडून 19 लाख रुपयांचे कर्ज देखील घेतलेले आहे. कुटुंबात प्रदीर्घकाळ राजकीय वारसा असलेले व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत. मात्र अन्य नेत्यांची तुलना करता त्यांच्याकडे फारसी संपत्ती नाही. त्यांच्याकडे कौटुंबिक संपत्तीचा वारसा मात्र आहे.

प्रतिस्पर्धी उमेदवाराने येऊन इंग्रजीतून चर्चा करावी

राजाभाऊ वाजे हे ग्रामीण भागातील आहेत. त्यांना इंग्रजी येत नाही, अशी टीका विरोधकांकडून त्यांच्यावर करण्यात आली होती. यावर वाजे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. वाजे म्हणाले की, माझे शिक्षण कॉन्व्हेंट शाळेत झालेले आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळेत मी इंग्रजीत शिकलो. साताऱ्याच्या सैनिक स्कूलमध्येही माझे शिक्षण झाले आहे. नाशिकच्या महाविद्यालयातून मी पदवी घेतलेली आहे. मी ग्रामीण भागात राहतो त्यामुळे या भागातील नागरिकांना अपील होईल, असा माझा साधा पेहराव असतो. जर विरोधकांना यामध्ये शंका वाटत असेल तर त्यांनी आपल्याशी इंग्रजीत चर्चा करावी, असे आव्हान राजाभाऊ वाझे यांनी दिले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT