Devendra Fadnavis to decide next Mayor of Nashik : नाशिक महापालिकेत १२२ पैकी ७२ जागा जिंकत भाजपने स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. महापौरपद सर्वसाधरण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे महिलाच महापौर होणार हेही फिक्स आहे. परंतु तब्बल दहा महिला महापौरपदासाठी इच्छुक असल्याने तिढा वाढला आहे.
भाजपचे ७२ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात तब्बल ४० महिला नगरसेवक आहेत. महापौरपद सर्वसाधरण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने तिथे केवळ उमेदवार महिला असणे पुरेसे आहे. यात कोणत्याही जातीची/प्रवर्गाची महिला उमेदवारी करु शकते. महापालिकेत निवडून आलेली कोणतीही महिला नगरसेविका (कोणत्याही प्रवर्गाची) या पदासाठी पात्र ठरते.
त्यामुळे ४० पैकी तब्बल १० महिला नगरसेविका महापौरपदासाठी आग्रही असल्याने या पदाचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणे कठीण बनले आहे. त्यामुळे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित नाशिकच्या महापौर पदाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे जलसंपदा तथा नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत भाजपच्या कार्यालयात मंत्री महाजन यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना नाशिकच्या महापौरपदाबाबत पत्रकारांनी विचारलं असता या पदासाठी दहा महिला आग्रही असल्याचं महाजन यांनीच सांगितलं. त्यामुळे यावर मुंबईत निर्णय होईल. मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीच अंतिम फैसला केला जाईल असं महाजन यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान राज्याच्या नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्तांनी नाशिकच्या महापौर व उपमहापौर पदाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार नाशिकचे महापौर, उपमहापौरपदासाठीची निवड प्रक्रिया दि. ६ फेब्रुवारीला पार पडणार आहे. निवडप्रक्रिया जवळ आल्याने इच्छुकांकडून लॉबिंग सुरु असून त्यांची धाकधूक वाढली आहे.
महापौरपदाच्या शर्यतीत हिमगौरी आडके, स्वाती भामरे, डॉ. दीपाली कुलकर्णी, चंद्रकला धुमाळ, दीपाली गिते, सुप्रिया खोडे आदी नावांचा समावेश आहे. मात्र, अंतिम निर्णय थेट फडणवीस यांच्या कोर्टात घेतला जाणार असल्याने नक्की कुणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार याची उत्सुकता नाशिककरांमध्ये आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.