Himgauri Adake-Aher Mayor's Decision Sparks Buzz After Municipal Controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Himgauri Adake- Aher: महापालिकेतील शिवीगाळ पडणार महागात?, महापौरांनी घेतला असा निर्णय की नगरसेवकांमध्ये खळबळ

Himgauri Adke Corporator Mukesh Shahane and Sudhakar Badgujar dispute big decision: नगरसेवक मुकेश शहाणे आणि सुधाकर बडगुजर यांच्या असभ्य वर्तनावर महापौरांच्या निर्णयाने बसणार वचक.

Sampat Devgire

Political tension in Nashik municipal corporation: महापालिकेच्या सिडको प्रभाग सभेतील नगरसेवकांच्या अर्वाच्य भाषा आणि वाद चर्चेचा विषय ठरला आहे. सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांनी परस्परांना शिवीगाळ केली होती. समाज माध्यमांवर या वादाचे तीव्र पडसाद उमटले.

हा वाद ताजा असतानाच आज महापालिकेची महासभा झाली. यावेळी नगरसेवकांतील हा वाद चर्चेत होता. प्रशासनानेही त्यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या महासभेत याबाबत चर्चा होणार का? हा उत्सुकतेचा विषय होता.

या वादाच्या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी आजच्या महासभेत महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयाने महापौरांनी  एक वेगळा संदेश दिला आहे. महापौरांचा हा निर्णय नगरसेवकांमध्येही वचक आणि धडकी भरवणारा ठरण्याची चिन्हे आहेत. 

महासभा सुरू असताना महापौरांनी यावर भाष्य केले. सिडकोच्या प्रभाग समितीत घडलेला प्रकार योग्य नव्हता. त्यामुळे नगरसेवकांच्या आणि महापालिकेच्या प्रतिमेवर परिणाम होतो. त्याचे तीव्र पडसाद नागरिकांमध्येही उमटल्याचे जाणवले आहेत. 

त्यामुळे यापुढे असे वर्तन करणाऱ्या नगरसेवकांना सहा महिन्यांसाठी महासभेसाठी निलंबित करण्यात येईल. हा निर्णय महासभा सुमोटो घेईल. असंख्य वर्तन करणाऱ्या नगरसेवकांना, शिस्त लागावी आणि त्यांना जरब बसावी यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महासभेला आणि नगरसेवकांना शिस्त लावण्यासाठी असे निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 

महासभा आणि विविध सभांमध्ये विशिष्ट नगरसेवक सातत्याने आक्रमक भूमिका घेत असतात. यावेळी नियम आणि शिरस्ता देखील बाजूला ठेवला जातो. त्यामध्ये अनेकदा राजकीय अभिनेवेश असल्याने हा वाद चर्चेचा विषय ठरतो. या  पार्श्वभूमीवर महापौरांनी घेतलेला निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.

महासभेतील नगरसेवकांनी आणि विशेषतः महिला नगरसेवकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. अशाप्रकारे असभ्य वर्तन करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी निर्णय घेणारी ही पहिली महासभा आणि महापौर ठरण्याची चिन्हे आहेत. दृष्टीने महापौर हिमगौरी आडके यांचा निर्णय राज्यभर वेगळा संदेश देणारा ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT