Mukesh Shahane: महापालिका बैठकीत मोठा गोंधळ; ब़डगुजर- शहाणे वाद पुन्हा पेटला, ‘मातोश्री’वरून शिवीगाळ, सभागृहातील राड्याची शहरभर चर्चा

Mukesh Shahane municipal meeting controversy: राजकीय वादत संयम सुटला, मुकेश शहाणे यांच्याकडून भर सभेतच सुधाकर बडगुजर यांना शिविगाळ करीत हमरी तुमरीमुळे नगरसेवक अचंबित
Sudhakar Badgujar | Mukesh Shahane
Sudhakar Badgujar | Mukesh ShahaneSarkarnama
Published on
Updated on

Badgujar Vs Shahane News: महापालिकेच्या सिडको विभागीय सभेत नगरसेवकांनी सोमवारी सर्व मर्यादा ओलांडल्या. परस्परांचा एकेरीवर येत उद्धार करत शिवीगाळ झाली. सभा सुरू असताना ज्येष्ठ नगरसेवकच भिडल्याने इतर उपस्थित अचंबित होऊन त्याचे मूक साक्षीदार बनले.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून पोलिसांचा ससेमीरा टाळण्यासाठी सुधाकर बडगुजर भाजप पक्षात सामील झाले. त्यांनी उमेदवारीच्या स्पर्धेत मुकेश शहाणे यांचा पत्ता कट केला. त्यावरून दोघांमध्ये जोरदार राजकीय वाद सुरू आहे. 

निवडणुकीतील या वादाचा दुसरा अंक सोमवारी सिडको महापालिका सभेत पाहायला मिळाला. यावेळी अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या मातोश्रीचा उद्धार करत शिवीगाळ केली. या दोन्ही ज्येष्ठ नगरसेवकांत हमरी तुम्ही झाल्याने सभेचे वातावरण तापले. 

Sudhakar Badgujar | Mukesh Shahane
Nashik MLC Election : गणेश गितेंच्या अर्जावर सह्या करणारे भाजपचे 9 नगरसेवक अडचणीत, पक्षश्रेष्ठींनी मागविला खुलासा

या महासभेत सिडकोतील पाणीटंचाईचा प्रश्न गाजला. महासभेच्या वेळी नगरसेवक भूषण राणे यांनी नागरिकांसह पाणी प्रश्नावर आंदोलन केले. पाण्याचा प्रश्न तीव्र असल्याने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते प्रवीण तिदमे, डॉ. पुनम महाले, पल्लवी गणोरे, कविता नाईक आदी नगरसेवकांनी आक्रमक होत त्यावर जाब विचारला. यावेळी सभापती बाळकृष्ण शिरसाट नवखे असल्याने ते उभे राहून सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. 

Sudhakar Badgujar | Mukesh Shahane
Nashik: नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेत चुरस; स्वीकृत नगरसेवकपदासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचे पारडे जड?

सभापती हस्तक्षेप करीत असताना शहाणे यांनी त्यांना नियम सांगून बसून बोलण्याचे सुचित केले. त्यावर भाजपचे सुधाकर बडगुजर यांनी ताशेरे ओढले. त्यावरून शहाणे चांगलेच संतप्त झाले. शिवीगाळ आणि एकेरीवर वाद आल्याने सर्व नगरसेवक अचंबित झाले. 

सभेत वाद झाल्याची चर्चा शहरभर वाऱ्यासारखी पसरली. समाज माध्यमांवर त्याची चांगलीच चर्चा झाली. निवडणुकीत बडगुजर आणि शहाणे यांच्यात प्रचंड वाद आणि राजकारण गाजले होते. त्याचा दुसरा अंक अनेक वर्षांनी होणाऱ्या सिडकोच्या सभेत झाला. 

सभेनंतर बडगुजर यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरसेवक शहाणे यांनी पुन्हा एकदा बडगुजर हे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याचा सहकारी सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टी करणारे आहेत, असा शेरा मारत हा वाद पुढे सुरूच राहणार असे संकेत दिले. त्यामुळे भाजपचे बडगुजर आणि अपक्ष शहाणे यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com