Ganesh Gite bjp Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MHADA Scam : नाशिक म्हाडा फसवणूक प्रकरणात भाजपच्या गणेश गितेंना दिलासा, तपासावर न्यायालयाचे प्रश्न

Ganesh Gite bail : नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात तब्बल १९४ जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. या प्रकरणातील अनेकांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, जिल्हा न्यायालयाने अर्ज फेटाळले होते.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिकमधील कथित म्हाडा फसवणूक प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

शहरातील ४९ गृहप्रकल्पांमध्ये म्हाडा सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी २० टक्के राखीव क्षेत्र ठेवण्याचा नियम धाब्यावर बसवून बनावट दस्तावेजांद्वारे ‘म्हाडा’ची फसवणूक केल्याचे कथित प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आले आहे. याप्रकरणी भूमी अभिलेख विभागाने १९४ विकासक, जागा मालक आणि भागीदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात सुमारे ४२ जणांनी अटकपूर्वसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला असता गेल्या २७ मार्चला तो फेटाळण्यात आला होता.

गुन्हा दाखल झालेल्या १९४ जणांपैकी भाजप नेते गणेश गिते यांच्यावरही आरोप असल्याने त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने गिते यांना अंतरिम जामीन मंजूर केला.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारी पक्षाच्या तपासावर आणि एफआयआर मधील विसंगतीवर प्रश्न उपस्थितीत केले. सरकारी वकिलांना मूळ FIR आणि कागदपत्रांचे अवलोकन केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कोणत्या कलमांतर्गत गणेश गीते यांच्यावर गुन्हा सिद्ध होतो? विशेष म्हणजे 'फसवणूक नेमकी कशी झाली त्यावर न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले. या प्रकरणातील तक्रारदार काजळे हे २०२३ मध्ये 'डीएलआर' कार्यालयात रुजू झाले आहेत. मग २०१६ मधील कागदपत्रांवरील स्वाक्षऱ्या बनावट आहेत, हे ते इतक्या खात्रीने कसे सांगू शकतात? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.

FIR नुसार, ८ नोव्हेंबर २०१३ च्या शासन निर्णयातील अटी टाळून २० टक्के जमीन ईडब्ल्यूएस आणि एलआयजीसाठी न सोडता कागदपत्रांत फेरफार केल्याचा आरोप आहे. मात्र, गिते यांच्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे २०१६ नंतरची आहेत. त्यामुळे २०१३ चा नियम या ठिकाणी लागू होऊन गुन्हा कसा घडतो, असा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला.

गणेश गीते यांच्या बाजूने अॅड. विवेक साळुंखे, अॅड. जयदीप वैशंपायन आणि अॅड. रविराज परामणे यांनी बाजू मांडली, तर राज्य सरकारच्या वतीने ए.पी.पी. फड यांनी काम पाहिले. यावेळी तक्रारदार काजळे हे न्यायालयात उपस्थित होते. तपास अधिकारी डॉ. अंचल मुदगल हे या गुन्ह्याचा तपास करत आहे.

व्यावसायिक सोनू मनवाणीला जामीन

दरम्यान याप्रकरणातील १९४ संशयित आरोपींपैकी पोलिसांनी केवळ सोनू मनवाणी यास अटक केली होती. त्यानंतर मनवाणीस न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर, सोनू मनवाणीची नाशिक न्यायालयाने शुक्रवारी (दि.१७) जामिनावर मुक्तता केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT