Sinner Milk FDA action Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News: सिन्नर दूध भेसळ प्रकरण गाजतय! १८ लाखांचे रसायन जप्त; अटक शून्य, २७ हजार लिटर दूध संकलन अचानक का घटलं?

Nashik milk adulteration action Sinnar FDA milk collection decreased-दूध भेसळीच्या मोठ्या कारवाईनंतर मास्टर माईंड बेपत्ता तर राजकीय नेत्यांचे मौन चर्चेत

Sampat Devgire

FDA News: राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासनाची कारवाई आणि छापे चर्चेत आहेत. सिन्नरला प्रशासनाने केलेल्या कारवाईत १८ लाखाचे साहित्य जप्त झाले. मात्र यातून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. त्यामुळे सिन्नरला सगळ्यात मोठी दूध संकलन संस्था कोणाची याची चर्चा सुरू झाली आहे. 

सिन्नर तालुका राजकीय सत्ता स्पर्धा आणि वादविवादासाठी चर्चेत असतो. दोन आठवड्यांपूर्वी येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. त्यात दूध भेसळीसाठी वापरले जाणारे रसायन मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले. 

सिन्नर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक होऊ शकलेली नाही. या संदर्भात पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहे. 

विशेष म्हणजे या कारवाईनंतर धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या तालुक्यात चारशेहून अधिक दूध संकलन संस्था आहेत. मात्र अवघ्या १४ संस्थांची ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणांकडे नोंदणी आहे. त्यामुळे नोंदणी न झालेल्या संस्था कोणाच्या व त्या संकलन कसे करतात? हा चर्चेचा विषय आहे. 

अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्यानंतर दूध संकलन केंद्र चालकांत घबराट पसरली. त्यानंतर तालुक्यात २७ हजार लिटर दूध संकलन घटले. तालुक्यात सर्वात मोठी प्रक्रिया संस्था सत्ताधारी पक्षाच्या राजकीय नेत्याची आहे. मात्र या संस्थेबाबत कुठेही चर्चा नाही.  

दैनंदिन २७ हजार लिटर दूध संकलन घटल्याने अनेकांना धक्का बसला आहे. यापूर्वी हे दूध संकलन कोणत्या संस्थेत होत होते आणि कोणाचे दूध संकलित केले जात होते हा वादाचा विषय आहे. दुधात झालेली गट ही भेसळयुक्त दुधाची तर नाही ना? हा चर्चेचा विषय आहे. 

सिन्नर तालुक्यात संकलित केले जाणारे दूध मुंबई सह लष्कराच्या यंत्रणा नाही पुरविले जाते. त्यामुळे दूधपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये घबराट पसरली आहे. भेसळ युक्त दूध अन्य कोणत्या संस्थांना पुरविले जाते? त्यावर सगळ्यांचेच मौन आहे. बहुतांशी दूध संकलन संस्था राजकीय नेत्यांच्या असल्याने तो चर्चेचा विषय आहे. खट झालेले दूध भेसळीचे तर नव्हते ना हा चर्चेचा विषय आहे. रखडलेली कारवाई केव्हा होणार? याची विचारणा होत आहे.

---------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT