MLC Election Nashik News 
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC Election : अनिल कदम अर्ज भरण्याच्या तयारीत होते पण.. ठाकरे सेनेने अखेरच्या क्षणी नाशिकच्या रिंगणातून माघार का घेतली?

Nashik MLC Election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी आमदार अनिल कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण त्यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. ठाकरे सेनेने या निवडणुकीतूनच माघार घेतली.

Ganesh Sonawane

Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषदेची जागा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला गेली होती. मात्र, असे असताना काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी ठाकरे सेनेचे संपर्कनेते रवींद्र मिर्लेकर यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली.

ठाकरे सेनेकडून माजी आमदार अनिल कदम व वसंत गिते यांनी अर्ज नेले होते. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्याचवेळी ठाकरे सेनेने या निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर संपर्कनेते रवींद्र मिर्लेकर यांनी पत्रकारपरिषद घेत सविस्तरपणे माघारीचे कारण स्पष्ट केले.

मिर्लेकर म्हणाले. या "निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू असल्याची चर्चा आहे. अशा प्रक्रियेत सहभागी होणे पक्षाला मान्य नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करूनच उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले". "तसेच महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनीही निवडणूक लढविण्याबाबत पुढाकार घेतला नसल्याचे मिर्लेकर यांनी अधोरेखित केले".

निवडणुकीपासून दूर राहण्याचे नेमके कारण विचारले असता यावर बोलताना मिर्लेकर यांनी सांगितले की, "या निवडणुकीत मतदारांचा जो रेट सुरू आहे, तो सर्वश्रुत आहे. आमची आर्थिक परिस्थिती आणि संख्याबळ पाहता, आम्ही या घोडेबाजारात सहभागी होणे टाळले आहे. माजी आमदार अनिल कदम अर्ज भरण्याच्या तयारीत होते. मात्र, पक्षाच्या बैठकीत उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितलं. पक्षाकडे आर्थिक सक्षम उमेदवार व पुरेसे संख्याबळ नसल्याची कबुली मिर्लेकर यांनी दिली.

अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या शक्यतेवर बोलताना, महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाचा अधिकृत उमेदवार असता, तर शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला असता. मात्र अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तरच आमचा पाठिंबा राहील. अन्यथा कोणत्याही अपक्षाच्या मागे उभे राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

५२ नगरसेवक कुणाला मतदान करणार?

लवकरच पक्षाच्या ५२ नगरसेवकांची बैठक घेतली जाणार आहे. त्यात त्यांना मतदानाबाबत योग्य त्या सूचना दिल्या जातील. निवडणुकीत तटस्थ राहायचे की कोणाला मतदान करायचे याचा निर्णय बैठकीत घेतला जाईल. या निर्णयाचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आला असून, मित्रपक्षांनाही त्याबाबत कल्पना देण्यात आली असल्याचं मिर्लेकर यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT